Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलंही करू शकतील ऑनलाईन पेमेंट! Paytm घेऊन आलं भन्नाट फीचर, बँक अकाऊंटशिवाय होणार व्यवहार

Paytm New Feature: पेटीएमने किशोरवयीन मुलांसाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने आता मुलं बँक अकाऊंटशिवाय ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत. यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. या नव्या फीचरबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 20, 2026 | 09:18 AM
मुलंही करू शकतील ऑनलाईन पेमेंट! Paytm घेऊन आलं भन्नाट फीचर, बँक अकाऊंटशिवाय होणार व्यवहार

मुलंही करू शकतील ऑनलाईन पेमेंट! Paytm घेऊन आलं भन्नाट फीचर, बँक अकाऊंटशिवाय होणार व्यवहार

Follow Us
Follow Us:
  • Paytm ने ‘Pocket Money’ फीचर लाँच केले आहे.
  • किशोरवयीन मुलांसाठी बँक अकाऊंटशिवाय UPI पेमेंटची सुविधा सुरू केली आहे.
  • पालकांना मुलांच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
  • या फीचरमुळे मुलांना सुरक्षित डिजिटल व्यवहारासोबत आर्थिक शिस्त शिकण्यासही मदत होणार आहे.
Paytm Pocket Money Feature: किशोरवयीन मुले व त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘पेटीएम’ (Paytm) ने नवे ‘पेटीएम पॉकिट मनी’ हे फीचर लाँच केले आहे. आता किशोरवयीन मुले स्वतःचे बँक अकाऊंट न उघडता देखील डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. या नव्या फीचरमुळे पालक मुलांना त्यांच्या खर्चावर लक्ष आणि नियंत्रणही ठेवता येणार आहे.

भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये

देशात सध्या डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी छोट्या भाजीवाल्यांपासून लाखो रुपयांचे व्यवहार करण्यापर्यंत लोकांना डिजीटल पेमेंट अत्यंत सुरक्षित पद्धत वाटते. शॉपिंग मॉल, कॅब बुकिंग, मोबाईल रिचार्ज, मेट्रो भाडे, विविध दुकाने किंवा इतर आवश्यक खर्चासाठी डिजीटल पेमेंटचा वापर केला जातो. डिजीटल पेमेंट करण्यासाठी बँक अकाऊंट गरजेचं असतं. मात्र आता डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम एक असं फीचर घेऊन आला आहे, ज्याच्या मदतीने बँक अकाऊंट न उघडता देखील किशोरवयीन मुले डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. यामुळे आता मुलांना कॅश बाळगण्याची गरज पडणार नाही. पेटीएम पॉकिट मनी फीचरद्वारे मुलांना एक सुरक्षित माध्यम मिळेल. यातून जबाबदार आर्थिक सवयी मुलांमध्ये निर्माण करणेही शक्य होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

१५ हजार खर्च मर्यादा

पेटीएम पॉकेट मनी अंतर्गत पालक एनपीसीआयच्या ‘यूपीआय सर्कल’ द्वारे मुलांना आमंत्रित करू शकतात. या अंतर्गत संपूर्ण यूपीआय सर्कलवर मासिक मर्यादा ही १५ हजार रुपये राहिल. तसेच एकाचवेळी वैयक्तिक पेमेंट हे ५ हजार रुपयांपर्यंत करता येईल. ही सेवा सेव्हिंग आणि करंट अशा दोन्ही खात्यांवर सुरू राहू शकते. लक्षात ठेवा की, या फीचरअंतर्गत केवळ देशात पेंमेंट करता येईल. मात्र, आंतरराष्ट्रीय पेमेंट करता येणार नाही तसेच रोख रक्कमही काढता येणार नाही.

ओटीपी मागण्याची गरज नाही

पेटीएमचे पॉकेट मनी फीचर अ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतर किशोरवयीन मुले स्वतःच्या फोनमध्ये पेटीएम अ‍ॅप वापरून ऑनलाईन आणि ऑफलाईन यूपीआय पेमेंट करू शकतील. नवीन फीचरअंतर्गत पेमेंट करताना त्यांना पालकांकडून ओटीपी मागण्याची गरज नाही. तसेच पालकांना व्हॉट्सअ‍ॅपवर क्यूआर कोड पाठवण्याचीही गरज भासणार नाही. पेटीएम पॉकेट मनी फीचरमुळे मुलांच्या खर्चावर लक्ष ठेवणं आणि नियंत्रण करणं आता अधिक सोपं होणार आहे. कारण खर्च झालेल्या डिटेल्सना हे फीचर आपोआप वेगळ्या श्रेणीत विभागेल. परिणामी कुटुंब मुलांच्या पॉकेट मनीचे बजेट अधिक चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकेल. यातून मुलांना आर्थिक शिस्त व पैसे वापराबाबतही शिकवण मिळू शकेल.

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?

खर्च मर्यादा

पेटीएम पॉकेट मनी फीचरमध्ये सुरक्षेची खास काळजी घेण्यात आली आहे. हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतर पहिल्या मिनिटांत फक्त ५०० रुपये आणि पहिल्या २४ तासांत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतच व्यवहार करता येतील.

नियंत्रण

पालक स्वतः ही मर्यादा बदलू शकतील किंवा मुलांचा अ‍ॅक्सेसही रद्द करू शकतील. डिव्हाईस लॉक असणे अनिवार्य आहे.

Web Title: Paytm launched new pocket money feature now your child can do online payment without bank account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • online payment
  • Paytm
  • Tech News

संबंधित बातम्या

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा
1

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
2

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
3

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
4

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.