Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
मेसेजिंग प्लॅटफॉर्म Arattai युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच Arattai साठी जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड जारी केले जाणार आहेत. याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. Zoho चे CEO श्रीधर वेम्बूने सांगितलं आहे की, होमग्रोन मेसेजिंग प्लॅटफॉर्म Arattai आता सिस्टम-वाइड अनिवार्य एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2EE) च्या अंतिम रोलआउट टप्पात पोहोचले आहे. लवकरच जारी केलं जाणारं हे अपडेट अॅपच्या सर्वात महत्वपूर्ण आर्किटेक्चरल बदलांपैकी एस असून सध्या ते अंतिम अंतर्गत चाचणीतून जात आहे आणि येत्या काही दिवसांत हे अपडेट युजर्ससाठी रोलआऊट केले जाण्याची शक्यता आहे.
Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये वेम्बू यांनी सांगितलं आहे की, टीमने ‘ऑप्शन 2’ ची निवड केली आहे, ज्यामध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सर्व संभाषणांवर लागू केले जाणार आहे. नवीन अपग्रेड रोलआऊटची सुरुवात वन-ऑन-वन चॅट्सद्वारे केली जाणार आहे आणि नंतर हे अपडेट चॅट्ससाठी देखील लागू केले जाणार आहे. हा बदल अत्यंत महत्त्वाचा असून त्याबाबत माहिती देताना वेम्बू यांनी सांगितलं की, आम्हाला यासाठी काही गोष्टी रि-डिझाईन कराव्या लागल्या आणि व्यापक चाचणी करायची होती कारण हा एक मोठा बदल आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वेम्बू यांनी सांगितलं आहे की, डेटा एन्क्रिप्ट करण्याची मूळ पद्धत योग्य पद्धतीने काम करत होती, मात्र एन्क्रिप्शन अनिवार्य केल्यानंतर मायग्रेशन वर्कफ्लो आणि फाइल ट्रान्सफर प्रक्रियेत काही अडचणी निर्माण झाल्या. या समस्या सुमारे 6,000 Zoho कर्माचाऱ्यांनी केलेल्या चाचणीदरम्यान समोर आल्या. एक फॉलो-अप पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, समोर आलेले मुद्दे अनिवार्य स्विच-ओवर प्रोसेसमध्ये होते आणि मोठ्या फाईल्स ट्रांसफर करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता स्विच-ओवर प्रक्रिया सुधारण्यात आली आहे.
या समस्या सोडवणाऱ्या एका नवीन बिल्डची आता अंतर्गत चाचणी केली जात आहे. जर या टप्प्यात कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, तर हे अपडेट युजर्ससाठी जारी केले जाणार आहे. मात्र सर्वांवर फोर्स्ड अपग्रेड असणार आहे. वेम्बू यांनी सांगितलं आहे की, हे सर्वांसाठी फोर्स्ड अपग्रेड असणार आहे, कारण हा एक मोठा बदल असणार आहे.
जे युजर्स आता अॅप अपडेट करणार आहेत, त्यांना अॅपचे इंटरफेस आधीपेक्षा जास्त स्मूद आणि फास्ट वाटू शकते. अॅपमधील अनिवार्य एन्क्रिप्शन फीचर अॅक्टिव्ह करण्यासाठी Zoho ला ते बॅकएंडमधून इनेबल करावं लागणार आहे. वेम्बूने सांगितलं आहे की, जरी त्यात आधीच अनिवार्य E2E एन्क्रिप्शनसाठी कोड आहे, परंतु आम्ही इनेबल केल्याशिवाय ते कार्य करणार नाही आणि आम्ही चाचणीच्या दुसऱ्या फेरीनंतर इनेबल करू.
Ans: हा अॅप Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे.
Ans: चॅटिंग, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, ग्रुप चॅट, मीडिया शेअरिंग, स्टेटस आणि सुरक्षा फीचर्स मिळतात.
Ans: होय, उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग दोन्ही सपोर्ट आहेत.






