
Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स
भारतात लाँच करण्यात आलेल्या फिलिप्स एस 7221 5G च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,499 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,499 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी या स्मार्टफोनवर काही लाँच ऑफर देखील देत आहे. लाँच ऑफरअंतर्गत एचएसबीसी ताज कार्डने पेमेंट केल्यास 3,000 रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. हा स्मार्टफोन सिल्व्हर, व्हाईट आणि ब्लॅक रंगांच्या पर्यांयात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: Instagram)
फिलिप्सने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 6.67 इंच एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये अधिक चांगल्या परफॉर्मंससाठी युनिसॉक T765 5G प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन रोजच्या कामांत, सोशल मीडिया आणि 5G कनेक्टिविटीमध्ये अधिक चांगला अनुभव ऑफर करण्याचा दावा करतो.
फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी स्मार्टफोनमध्ये 64MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये पीडीएएफ आणि एलईडी फ्लॅशचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॅमेरा फीचर्समध्ये AI सीन ऑप्टिमाइजेशन आणि पोर्ट्रेट मोड देखील दिला आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनची विशेषत: म्हणजेच 5700mAh बॅटरी दिली आहे, जी दिर्घकाळ वापराचा अनुभव ऑफर करतो. तसेच, या डिव्हाईसमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळणार आहे.
कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ड्युअल नॅनो सिम, हाइब्रिड टि-फ्लॅश कार्ड स्लॉट, डुअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि ए-जीपीएस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.