Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

India Mobile Congress 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाइल काँग्रेस 2026 (IMC 2026) चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी देशातील डिजिटल क्रांती आणि 5G कनेक्टिव्हिटीच्या विस्तारावर भाष्य केले. पूर्वी डिजिटल दरी हे भारतासमोरील मोठे आव्हान होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2026 | 11:19 AM
देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

Follow Us
Follow Us:
  • ‘पूर्वी डिजिटल दरी मोठे आव्हान होते
  • आता देशभर 5G चे जाळे’
  • इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये मोदींचे प्रतिपादन
 

India Mobile Congress 2026: सुरुवातीच्या काळात लोकांच्या हातात मोबाईल फार कमी पाहायला मिळत होते कारण तो काळ 2G चा होता. मोबाईलमध्ये इंटरनेट होतं, मात्र ते खूप धिम्या गतीने चालायचं. त्यानंतर बाजारात 3G , 4G आणि आता तर 5G चे तंत्रज्ञान आले आहे. 5 जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation). वेगवान नेटवर्क स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, उत्कृष्ट सेवा आणि बरेच काही…

याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 ऑक्टोबर 2026) इंडिया मोबाईल काँग्रेस २०२६ चे उद्घाटन केले असून आयएमसी २०२६ हा देशातील सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि दूरसंचार कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आयोजित केला जात आहे. ही आयएमसीची १० वी आवृत्ती आहे.

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

आयएमसी २०२६ चे उद्घाटन करताना नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम जनतेचे आभार मानले. आजचा दिवस भारतासाठी विशेष असल्याचे त्यांनी सांगितले. काल देशसेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. उद्घाटनासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेते नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली.

डिजिटल इंडियाचा पाया

यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गेल्या १०-१२ वर्षांत मोबाईल फोन प्रशासनाचे एक साधन म्हणून उदयास आला आहे. तो आपल्या डिजिटल इंडियाचा पाया राहिला आहे. आज मोबाईल फोनमुळे दुर्गम गावातील मुलांना आणि गरिबांनाही चांगले शिक्षण मिळत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्याने, कोविड-१९ महामारीच्या काळातही मोबाईल फोनद्वारे काम आणि शिक्षण सुरू राहिले. दुर्गम गावांमधील मुलांनाही डिजिटल शिक्षणाचा लाभ घेता येत आहे. त्यांनी ऑनलाइन शिक्षणासाठीच्या ‘दीक्षा’ प्लॅटफॉर्मवरही चर्चा केली.

इंडिया मोबाईल काँग्रेसची संकल्पना ‘स्केल विदाऊट बाउंडरीज’ (मर्यादांशिवाय विस्तार) ही आहे. येथे 5G, 6G, AI, IoT, सॅटेलाइट कम्युनिकेशन्स आणि इतर नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित केले जाईल. जगभरातील प्रमुख टेक आणि टेलिकॉम कंपन्या, स्टार्टअप्स आणि उद्योगातील नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत. चला पाहूया, येथे काय काय उपलब्ध आहे.

भविष्यातील तंत्रज्ञानाची एक झलक

IMC 2026 हे आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शन आहे. भारत आणि जगभरातील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या, उदयोन्मुख स्टार्टअप्ससोबत, त्यांची उत्पादने आणि भविष्यातील तंत्रज्ञान प्रदर्शित करत आहेत. या कार्यक्रमात टेलिकॉमला 5G वरून 6G मध्ये कसे रूपांतरित करायचे यावरही चर्चा होईल.

स्वदेशी बनावटीची कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कशी विकसित करावी आणि तिचा उपयोग सार्वजनिक हितासाठी कसा करता येईल यावरही चर्चा होईल. स्टार्टअप्स त्यांची AI उत्पादने प्रदर्शित करू शकतात. याव्यतिरिक्त, स्मार्ट मोबिलिटी आणि औद्योगिक रोबोटिक्स यांसारख्या काही नवीन तंत्रज्ञानाचा यावर्षी समावेश करण्यात आला आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची अपेक्षा आहे. प्रात्यक्षिके आणि प्रदर्शने देखील आयोजित करण्यात आली आहेत.

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

Web Title: Pm narendra modi inaugurates india mobile congress 2026 5g sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • india
  • narendra modi
  • Tech News

संबंधित बातम्या

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
1

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे
2

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
3

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.