फोटो सौजन्य: @JagannathR78919 (X.com)
पोको हा भारतातील आघाडीचा परफॉर्मन्स-केंद्रित टेक्नॉलॉजी ब्रँड आहे. कंपनीने उत्तम आणि बजेट फ्रेंडली फोन्स मार्केटमध्ये लाँच केले आहे. नुकतेच कंपनीने नवीन स्मार्टफोन पोको C71 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, अत्याधुनिक फीचर्स आणि स्वस्त किंमतीत दमदार परफॉर्मन्स यांचे उत्तम कॉम्बिनेशन आहे.
फक्त 6,499 मध्ये उपलब्ध असलेला पोको C71 हा कंपनीचा एकमेव स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 6.88-इंच HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, आणि TÜV Rheinland ट्रिपल आय प्रोटेक्शन आहे. मनोरंजन किंवा स्क्रोलिंगसाठी हा डिस्प्ले सुरक्षित आणि स्मूथ अनुभव देतो. याशिवाय, वेट टच डिस्प्ले आहे, जो हात ओले असतानाही अचूक टच रेकग्निशन सुनिश्चित करतो.
स्लीक फ्लॅट फ्रेम आणि स्टायलिश कॅमेरा डेकोमुळे हा डिव्हाइस प्रीमियम लुक आणि फिल देतो. 8.26mm स्लिम बॉडी आणि गोल्ड, ब्लू व ब्लॅक या तीन आकर्षक रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.
पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले, “पोको C71 हा पॉवर, परफॉर्मन्स आणि इनोव्हेशनचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. बजेट सेगमेंटमधील लिमिट ओलांडत हा स्मार्टफोन 120Hz डिस्प्ले, 12GB डायनॅमिक रॅम आणि अँड्रॉइड 15 सह कोणतीही तडजोड न करता उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो.”
पोको C71 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 12GB डायनॅमिक रॅम (6GB+6GB व्हर्च्युअल) आहे, जो जवळपास 36 महिने उत्तमरीत्या कार्यरत राहतो. हा फोन Android 15 सह येतो आणि 2+4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. तसेच, 32MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा हाय -क्वालिटीचे फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करतो. 5200mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंगमुळे दिवसभर स्मार्टफोन वापरणे सहज शक्य आहे.
6.88-इंच HD+ 120Hz डिस्प्ले (TÜV Rheinland सर्टिफाइड)
स्लीक आणि स्टायलिश डिझाइन (8.26mm जाडी, तीन रंग)
12GB रॅम आणि अँड्रॉइड 15 (2+4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स)
ऑक्टा-कोर प्रोसेसर (36 महिने स्मूथ परफॉर्मन्स)
32MP ड्युअल कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा
5200mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग
IP52 स्प्लॅश आणि डस्ट रेसिस्टन्स
4GB RAM + 64GB स्टोरेज: ₹6,499
6GB RAM + 128GB स्टोरेज: ₹7,499
एअरटेल ऑफर: एअरटेल वापरकर्त्यांसाठी हा स्मार्टफोन फक्त ₹5,999 रुपयात मिळेल.
स्पेशल डील: 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर हा फोन उपलब्ध असेल.