Price Dropped: फ्लिपकार्टची ही Deal मिस करू नका! Samsung चा 'हा' प्रिमियम स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवीन ऑफर्स आणि डिल्स घेऊन येत असतो. या ऑफर्स आणि डिल्स इतक्या अप्रतिम असतात, ज्यामुळे लोकांचा प्रचंड फायदा होतो. आता देखील फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन डिल घेऊन आला आहे. ज्यांना प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, पण बजेट कमी आहे. अशा लोकांसाठी ही डिल आहे. फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांना सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे.
Jio Choice Number: तुम्हालाही जिओचा खास VIP नंबर पाहिजे आहे का? मग, आताच फॉलो करा या स्टेप्स
तुम्ही जर प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डिल तुमच्यासाठी आहे. Samsung चा दमदार फ्लॅगशिप फोन Galaxy S24+ 5G आता फ्लिपकार्टवर अर्ध्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Flipkart या स्मार्टफोनच्या खरेदीवर उत्तम ऑफर्स आणि डिस्काऊंट देत आहे. ही फ्लिपकार्टची मर्यादित काळासाठीची ऑफर आहे, म्हणून जर तुम्ही एक शक्तिशाली आणि स्टायलिश फोन शोधत असाल, तर Samsung Galaxy S24+ 5G तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. फ्लिपकार्ट या स्मार्टफोनवर कोणती डिल देत आहे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy S24+ 5G चा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज वाला मॉडेल कंपनीने 99,999 रुपयांना लाँच केला होता. मात्र हाच मॉडेल फ्लिपकार्ट तुम्हाला अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी देणार आहे. फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S24+ 5G चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजवाला मॉडेल 54,999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर तब्बल 45000 रुपयांचं डिस्काऊंट ऑफर करत आहे. याशिवाय बँकिंग ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.
याशिवाय Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना 5 टक्क्यांचं अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळणार आहे. एवढचं नाही, तर फोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI सारख्या सुविधा देखील दिल्या जात आहेत. म्हणजेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून डिस्काऊंटची किंमत आणखी वाढवू शकता.
Samsung Galaxy S24+ 5G मध्ये 6.7 इंचाचा 2K LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शनसह येतो. हा फोन Exynos 2400 चिपसेटवर आधारित आहे, या चिपसेटमुळे स्मार्टफोन अधिक पावरफुल बनतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 50MP ची प्राइमरी लेंस, 10MP चा टेलीफोटो आणि 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा स्मार्टफोनमध्ये आहे. OIS सपोर्टच्या मदतीने फोटोज आणि व्हिडीओ अधिक स्टेबल आणि क्लिअर राहतात. सेल्फीसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 4900mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यासोबतच यामध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे.