या सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालणार पुतीन! लवकरच लाँच करणार नवं मेसेजिंग प्लॅटफॉर्म
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम जगभरात लोकप्रिय आहेत. या प्लॅटफॉर्मचे करोडो युजर्स आहेत. मित्रांपासून कुटूंबियांपर्यंत सर्वांना मेसेज आणि कॉल करण्यासाठी या प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जातो. हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. मात्र आता या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मालकांसाठी एक वाईट बातमी आहे. रशियामध्ये लवकरच मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर बंदी घातली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर बंदीस घातल्यानंतर रशिया आपलं स्वत:चं अॅप लाँच करणार आहे. या अॅपचं संपूर्ण नियंत्रण सरकारकडे असणार आहे. या नव्या अॅपचं नाव Vlad असणार आहे. हे अॅप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मिळालेल्या सूचनांनुसार डिझाइन केलं जात आहे. रशियाच्या कनिष्ठ संसदेनेही या अॅपला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच रशियामधील नागरिकांना हे नवं अॅप वापरण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
रशियाच्या इन्फॉर्मेशन पॉलिसी समितीचे प्रमुख सर्गेई बोयार्स्की यांनी सांगितलं आहे की, हे अॅप सिक्योर मल्टीफंक्शनल अल्टरनेटिव असणार आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, हे अॅप विदेशी असुरक्षित मेसेज प्लॅटफॉर्म्सना रिप्लेस करणार आहे. यासोबतच त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, हे अॅप रशियाच्या डिजिटल सुरक्षा पायाभूत सुविधांमधील पोकळी भरून काढेल.
रशियामध्ये तयार करण्यात आलेल्या नव्या अॅपला रशियाच्या कनिष्ठ संसदेने मान्यता दिली आहे. आता नव्या अॅपला राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची मंजुरी आवश्यक आहे. रशियाचे डिजिटल विकास मंत्री मकसुत शादायेव यांनी सांगितलं आहे की, अशा अॅप्स सध्या आमची सर्वोच्च प्राथमिकता आहेत. अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यात इतर देश रशियापेक्षा पुढे आहेत असेही त्यांनी सांगितले.
WhatsApp किंवा Telegram पेक्षा वेगळ असणाऱ्या Vlad App चा कंट्रोल सरकार आणि लोकल बॉडीकडे असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या अॅपच्या मदतीने यूजर्स वैयक्तिक माहिती मिळवू शकतील, पेमेंट करू शकतील आणि इतर कामे करू शकतील. याशिवाय, शैक्षणिक सेवांसाठी देखील या नवीन प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. यासोबतच, या अॅपमध्ये यूजर्सच्या प्रायवसीची देखील काळजी घेण्यात आली आहे.
मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral
सध्या, व्लाडचे अॅप रशियाबाहेर वापरले जाऊ शकत नाही. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, रशियामध्ये व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम अॅप्सवर बंदी घातली जाऊ शकते. यासोबतच, रशियातील नागरिकांना हे अॅप वापरण्यास सांगितले जाऊ शकते.