Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या मदतीने उलघडणार विमान अपघाताचं कारण? काय आहे ही टेक्नोलॉजी? जाणून घ्या
Black Box Technology: अहमदाबादच्या एयर इंडिया विमान अपघातानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. मृतांमध्ये 12 क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे. हा अपघात कसा झाला, अपघाताचं कारण काय आहे, याबाबत आता तपास केला जात आहे. नॅशनल सिक्योरिटी गार्ड (NSG) ने अपघात झालेल्या ठिकाणाहून ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे. यामुळे आता अशी आशा आहे की, ब्लॅक्स बॉक्सच्या मदतीने अपघाताचं कारण समोर येऊ शकतं. ब्लॅक बॉक्स नक्की काय आहे, त्याच्या मदतीने अपघाताचं कारण कसं समोर येऊ शकतं, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets
सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्सचा रंग ब्लॅक नाही तर नारंगी असतो. एखाद्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स अगदी सहजपणे शोधता यावा, यासाठी ब्लॅक बॉक्सला नारंगी रंग दिलेला असतो. विमानाच्या सर्वात मजबूत भागात ब्लॅक बॉक्स जोडला जातो. म्हणजेच अगदी कोणतीही दुर्घटना झाली तर नॅशनल सिक्योरिटी गार्ड अगदी सहजपणे ब्लॅक बॉक्स शोधू शकतील. (फोटो सौजन्य: X)
ब्लॅक बॉक्स दोन भागांत विभागला जातो. यामध्ये CVR (Cockpit Voice Recorder) आणि FDR (Flight Data Recorder) यांचा समावेश आहे. या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि या टेक्नोलॉजीची वैमानिकांना कशी मदत होते, याबद्दल आता जाणून घेऊया.
1. CVR (Cockpit Voice Recorder)- हा भाग कॉकपिटमधील पायलट आणि सह-पायलटमधील संभाषण, वार्निंग अलार्म आणि इतर आवाज रेकॉर्ड करतो. म्हणजेच, अपघातापूर्वी पायलट काय बोलत होते, कोणता अलार्म वाजला की नाही, या सर्व गोष्टी Cockpit Voice Recorder मध्ये रेकॉर्ड केल्या जातात. ज्यामुळे अपघातानंतर माहिती मिळण्यास मदत होते.
2. FDR (Flight Data Recorder)- याच्या मदतीने संख्या गोळा केल्या जातात. जसं की, विमान किती ऊंचावर होतं, त्याचा वेग किती होता, कोणते सिस्टम काम करत होते, कोणते फेल झाले होते, या सर्वाची माहिती FDR (Flight Data Recorder) मध्ये स्टोअर केली जाते.
WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल
जेव्हा एखाद्या विमानाचा अपघात होतो, तेव्हा नॅशनल सिक्योरिटी गार्डचं सर्वात महत्त्वाचं काम असतं ब्लॅक बॉक्स शोधणं. या डिव्हाईसची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर विमान पाण्यात पडलं तर हे डिव्हाईस 30 दिवसांपर्यंत सतत एक सिग्नल पाठवत असतो. ज्याच्या मदतीने हे डिव्हाईस ट्रॅक करणं अगदी सोपं होतं. ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर त्यामधील ऑडियो आणि डेटा विशेषज्ञ कंप्यूटर सिस्टमच्या मदतीने वाचला जाऊ शकतो. पायलटमधील संभाषणे, अचानक येणारे अलार्म, इंजिनमध्ये बिघाड किंवा इतर तांत्रिक समस्या हे सर्व ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केलं जातं. या रेकॉर्ड्सच्या मदतीने अपघाताचं कारण देखील समोर येऊ शकते.