Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आरबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. १०,००० रुपयांपेक्षा जास्त UPI आणि IMPS व्यवहारांवर 1 तासाचा ‘कूलिंग पीरियड’ लागू करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 11, 2026 | 02:10 PM
UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन

UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन

Follow Us
Follow Us:
  • 10,000 रुपयांवरील UPI/IMPS व्यवहारांवर 1 तासाचा होल्ड ठेवण्याचा प्रस्ताव, ज्यामुळे फ्रॉड असल्यास व्यवहार रद्द करता येईल.
  • 70 वर्षांवरील व्यक्तींना मोठ्या व्यवहारांसाठी ‘ट्रस्टेड पर्सन’ची परवानगी अनिवार्य करण्याची शक्यता.
  • ‘किल स्विच’ फीचरद्वारे सर्व डिजिटल पेमेंट सेवा एका क्लिकमध्ये बंद करण्याचा पर्याय देण्याचा विचार.
तुम्ही युपीआय किंवा आयएमपीएसद्वारे कोणालाही १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवत असाल, तर ती रक्कम संबंधितापर्यंत पोहोचण्यासाठी आता एक तास वाट पाहावी लागू शकते. देशात वाढणारी डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) हे मोठे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. नवीन योजनेनुसार, १०,००० रुपयांवरील डिजिटल व्यवहारांवर १ तासाचा ‘कुलिंग पिरीयड’ लागू केला जाऊ शकतो. आरबीआयने या प्रस्तावावर ८ मे पर्यंत सूचना मागवल्या असून, त्यानंतर अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. दरम्यान, सध्या आपण यूपीआय व्यवहार करतो तेव्हा पैसे काही सेकंदात समोरच्या व्यक्तीला मिळतात. फसवणूक करणाऱ्या टोळ्या याच वेगाचा फायदा घेतात.

BSNL Recharge Plan: काय सांगता! नव्या प्लॅनमध्ये मिळणार तब्बल 5000GB मंथली डेटा आणि फ्री OTT अ‍ॅप्स, किंमत खिशाला परवडणारी

हे प्रयत्न का केले जात आहेत ?

या निर्णयामागील मुख्य कारण वाढता डिजिटल फसवणुकीचा दर आहे. आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये २५५१ कोटी रुपयांच्या फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली आणि २०२५ पर्यंत हा आकडा २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. एकूण फसवणुकीपैकी ९८% व्यवहार हे १०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे असतात. यामुळे ऑनलाइन धमक्यांद्वारे होणारी फसवणूक देखील रोखली जाईल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

किल स्विचवरही चर्चची शक्यता

  • १०,००० रुपयावरील व्यवहारांना १ तासासाठी ‘होल्ड’वर ठेवले जाईल, या काळात ग्राहकाला समजले की हा फ्रॉड आहे, तर तो व्यवहार रद्द करू शकेल.
  • ७० वर्षांवरील व्यक्तींनी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केल्यास, त्याच्या ‘ट्रस्टेड पर्सन’ म्हणजेच विश्वासू व्यक्तीची परवानगी अनिवार्य असेल.
  • वैयक्तिक किवा छोट्या व्यावसायिक खात्यांमध्ये २५ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्यास, बँक खात्री केल्याशिवाय ती क्रेडिट करणार नाही.
  • आरबीआय ‘किल स्विच सुविधेचा विचार करत आहे. या एका बटणाद्वारे ग्राहक आपले सर्व डिजिटल पेमेंट चैनल्स (यूपीआय, इंटरनेट बँकिंग, कार्ड्स) एकाच वेळी बंद करू शकेल.
Amazfit T-Rex Ultra 2 भारतात लाँच! 30 दिवसांची बॅटरी आणि 180+ स्पोर्ट्स मोडसह मिळणार हे फीचर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

अनेकांची गैरसोय होऊ शकते

तज्ज्ञांनुसार या निर्णयाचे काही तोटेही आहेत. तातडीच्या कामांसाठी (उदा. मेडिकल इमर्जन्सी किंवा तातडीची खरेदी) १०,००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करताना १ तास वाट पाहावी लागेल, ज्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. याशिवाय प्रवासासाठी अचानक तिकीट बुक करायचे असेल आणि ती रक्कम १०,००० रुपयांच्या वर असेल, तर १ तास वाट पाहणे जीवावर बेतू शकते. अशा वेळी वेळेवर पैसे न पोहोचल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Web Title: Rbi may introduce 1 hour cooling period for upi transactions above 10000 rupees to curb digital fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • UPI payment

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
4

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.