Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सिजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर

Mobile Liquid Tree SALT technology: वाढते वायू प्रदूषण आणि कमी होत जाणारी हरितक्षेत्रे यामुळे शहरांमध्ये स्वच्छ हवेचा प्रश्न गंभीर बनत आहे. यावर उपाय म्हणून भारतीय शास्त्रज्ञांनी स्मार्ट एल्गल लिक्विड ट्री हे देशातील पहिले मोबाईल लिक्विड ट्री विकसित केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 10, 2026 | 01:48 PM
आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सीजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर

आता झाडांशिवाय मिळणार ऑक्सीजन! भारतात आले पहिले मोबाईल Liquid Tree SALT, काय आहे नवीन टेक्नोलॉजी? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • भारतातील शास्त्रज्ञांनी स्मार्ट एल्गल लिक्विड ट्री (SALT) नावाचे देशातील पहिले मोबाईल लिक्विड ट्री विकसित केले आहे.
  • हे तंत्रज्ञान मायक्रोअल्गीच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड शोषून प्रकाशसंश्लेषणाद्वारे ऑक्सिजन सोडण्याचे काम करते.
  • झाडे लावणे शक्य नसलेल्या शहरी आणि प्रदूषित भागांसाठी हे तंत्रज्ञान पूरक उपाय म्हणून विकसित करण्यात आले आहे.
वायू प्रदूषण सध्याच्या काळात देशातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. विशेषत: शहरांमध्ये वायू प्रदूषणमुळे अनेक लोकं आजारी पडत आहेत. वायू प्रदूषणाचा परिणाम लहान मुलांवर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या वायू प्रदूषणाचा विचार करता आता वैज्ञानिकांनी असे एक तंत्रज्ञान तयार केले आहे, ज्याच्या मदतीने आता लोकांना जास्त ऑक्सिजन मिळू शकते. खरं तर प्रत्येक ठिकाणी झाडं लावणं शक्य नाही. यामुळेच वैज्ञानिकांनी एक मोबाईल लिक्विड झाड तयार केले आहे. हे तंत्रज्ञान काय आहे आणि याची मदत कशी होणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर

देशातील पहिले लिक्विड ट्री

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीएसआईआर-सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ माइनिंग एंड फ्यूल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी भारताचे पहिले मोबाईल लिक्विड ट्री तयार केले आहे. या नव्या तंत्रज्ञानाचे नाव स्मार्ट एल्गल लिक्विड ट्री (SALT) असे आहे. याचा उद्देश मोठी शहरं आणि जास्त प्रदूषण असलेल्या परिसरातील हवेची गुणवत्ता अधिक चांगली करणं, असा आहे.  (फोटो सौजन्य: X) 

प्रदूषण कमी करण्यासाठी कशी मदत होणार?

स्मार्ट एल्गल लिक्विड ट्री (SALT) चे काम करण्याची पद्धत झाडांशी खूप मिळतेजुळते आहे. असं सांगितलं जातं आहे की, जेव्हा प्रदूषित हवा सिस्टिमच्या संपर्कात येते, तेव्हा त्यामधील कार्बन डाइऑक्साइड सूक्ष्मशैवाल (माइक्रोएल्गी) द्वारे शोषला जातो. यानंतर फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे ऑक्सिजन हवेत सोडला जातो. एवढंच नाही तर, या सिस्टिमची आणखी एक खास गोष्ट म्हणजेच, हे तंत्रज्ञान केवळ सूर्याच्या प्रकाशावर आधारित आहे. तसेच, गरज पडल्यास हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल लाईटवर देखील अगदी सहज काम करू शकते.

कसे काम करते हे तंत्रज्ञान?

SALT म्हणजेच स्मार्ट एल्गल लिक्विड ट्री एक छोटे आणि पोर्टेबल एयर प्यूरीफिकेशन सिस्टिम आहे. ज्यामध्ये पाण्यासोबत खूप छोट्या माइक्रोएल्गीचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसची एका बंद सिस्टिममध्ये प्रतिकृती तयार करते. हा प्रकल्प झारखंडमधील धनबाद येथील सीएसआयआर-सीआयएमएफआर कॅम्पसमध्ये आणि मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड कॅम्पसमध्ये आधीच स्थापित करण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची गतिशीलता, म्हणजेच याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हलवता येते.

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

शास्त्रज्ञांचं काय मत आहे?

शास्त्रज्ञांचं असं मत आहे की, या तंत्रज्ञानाचा उद्देश असा आहे की, अशा ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर करणं जिथे पूर्णपणे झाडं लावणं अशक्य आहे. पण जिथे झाडं लावणं शक्य आहे किंवा आधीपासूनच ज्या ठिकाणी झाडे लावलेली आहेत, अशा ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकत नाही. हे तंत्रज्ञान केवळ एक पर्याय म्हणून विकसित करण्यात आले नाही, खऱ्या झाडांची जागा घेण्यासाठी नाही.

Web Title: What is mobile liquid tree salt technology in which oxygen get without trees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
1

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
2

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर
3

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
4

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.