Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित

ऑनलाइन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. युजर्सची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवीन नवीन मार्ग शोधत आहेत. याच घटनांना आळा घालण्यासाठी RBI ने नवीन UPI सुरक्षा गाइडलाइन जारी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2025 | 12:36 PM
UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Follow Us
Close
Follow Us:
  • UPI युजर्ससाठी RBI ने शेअर केल्या स्मार्ट ट्रिक्स
  • ओटीपी शेअर करणं तुमच्यासाठी ठरू शकतं धोकादायक
  • सुरक्षित व्यवहारासाठी फॉलो करा UPI च्या जबरदस्त ट्रिक्स

सध्याच्या काळात UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकं अगदी छोट्या खरेदीपासून मोठ्या शॉपिंगपर्यंत सर्वासाठी ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहे. ऑनलाईन पेमेंटचे बरेच फायदे आहेत. या फायद्यांसोबतच काही तोटे देखील आहेत. ऑनलाईन पेमेंटच्या वाढत्या वापरासोबतच फ्रॉडच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच सर्वांचा विचार करून युजर्सच्या सुरक्षेसाठी भारतीय रिजर्व बँक म्हणजेच RBI ने नवीन UPI सुरक्षा गाइडलाइन जारी केली आहे. RBI ने 5 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, या नियमांचे पालन केल्यास तुमचे बँक अकाऊंट आणि डिजिटल पेमेंट 100 टक्के सुरक्षित राहणार आहे. चला तर मग RBI च्या या नव्या नियमांबद्दल जाणून घेऊया.

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर

अनोळखी लिंक किंवा QR कोड स्कॅन करू नका

RBI ने नवीन UPI सुरक्षा गाईडलाईनमध्ये सांगितलं आहे की, फिशिंग लिंक आणि नकली QR कोड UPI फ्रॉडचे सर्वात जुने मार्ग आहेत. कधीकधी रिफंड किंवा कॅशबॅकच्या नावाखाली स्कॅमर्स युजर्सना लिंक किंवा QR कोड पाठवतात. युजर्सनी या लिंकवर क्लिक करताच किंवा QR कोड स्कॅन करताच युजर्सचे बँक डिटेल्स चोरी होतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

UPI पिन किंवा ओटीपी शेअर करू नका

स्कॅमर्स स्वत:ला बँक अधिकारी किंवा पेमेंट अ‍ॅपचा एजंट असल्याचे सांगत युजर्सकडून UPI पिन किंवा ओटीपीची मागणी करतात. मात्र RBI ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, कोणतीही कायदेशीर संस्था कधीही यूजरला OTP, पिन किंवा पासवर्ड शेअर करण्यास सांगत नाही.

ऑफिशियल अ‍ॅप आणि वेबसाइटवरूनच ट्रांजेक्शन करा

RBI ने सांगितलं आहे की, फेक UPI अ‍ॅप आणि वेबसाइट्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे UPI अ‍ॅप आणि वेबसाइट्स अगदी खऱ्याप्रमाणे दिसतात. अशा फेक UPI अ‍ॅप आणि वेबसाइट्सवर क्लिक करताच तुमची माहिती हॅकर्सकडे पोहोचते. त्यामुळे कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करताना डेवलपरचे नाव तपासा.

नाव आणि UPI ID दोनवेळा तपासा

RBI ने UPI सुरक्षा गाईडलाइनमध्ये सांगितलं आहे की, कोणत्याही व्यक्तीला पेमेंट करण्यापूर्वी त्याचे नाव, मोबाईल नंबर किंवा UPI ID काळजीपूर्वक तपासा. अनेक स्कॅमर्स खोट्या नावाने अकाऊंट तयार करतात, जे एखाद्या मोठ्या ब्रँडच्या नावाप्रमाणे दिसतं. अशा परिस्थितीत, पैसे देताना, ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे पाठवत आहात त्याचे नाव देखील तपासा.

तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक

फ्रॉडचे शिकार होताच तक्रार करा

जर तुम्हील एखाद्या UPI फ्रॉडचे शिकार झाला असाल तर कोणतीही वाट न बघता सर्वात आधी तक्रार करा. RBI ने सांगितलं आहे की, 24 तासांच्या आत यूजरची तक्रार नोंदवा. यासाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवेशी तात्काळ संपर्क साधू शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही 1930 (नॅशनल सायबर हेल्पलाइन) वर कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

UPI म्हणजे काय?
UPI (Unified Payments Interface) ही एक डिजिटल पेमेंट प्रणाली आहे, जी बँक खात्यांदरम्यान त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते.

UPI वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?
तुमच्याकडे स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन, बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे.

कोणती अ‍ॅप्स UPI सपोर्ट करतात?
फोनपे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, भीम, क्रेड आणि इतर अनेक अ‍ॅप्स UPI सेवा देतात.

UPI PIN म्हणजे काय?
UPI PIN हा 4 किंवा 6 अंकी गुप्त कोड असतो, जो प्रत्येक ट्रान्सफरवेळी पेमेंट कन्फर्म करण्यासाठी लागतो.

Web Title: Rbi shares five smart tricks for upi users money will be safe by this tricks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • RBI
  • Tech News
  • UPI payment

संबंधित बातम्या

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर
1

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर

तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक
2

तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय
3

iPhone यूजर्ससाठी धक्का! Apple ने या दोन डेटिंग अ‍ॅप्सना दाखवला बाहेरचा रस्ता, या कारणामुळे घेतला कठोर निर्णय

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स
4

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.