तुमच्या सेल्फीला मिळणार meme चा तडका! Google Photos चं नवं फीचर सोशल मीडियावर घालणार धुमाकूळ, जाणून घ्या अधिक
टेक कंपनी Google सतत त्यांच्या अॅप्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) फीचर्सचा समावेश करत आहे. ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक पर्सनल आणि क्रिएटिव होणार आहे. कंपनीने गुगल फोटोमध्ये अनेक नवीन फीचर जोडले आहेत. आता पुन्हा एकदा कंपनीने या अॅपसाठी एक नवीन फीचर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या फीचरचं नाव ‘Me Meme’ आहे. हे फीचर युजर्सची सेल्फी एका मजेदार मीममध्ये बदलू शकणार आहे. हे फीचर अतिशय मजेदार असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
‘Me Meme’ फीचरला Android Authority ने Google Photos च्या वर्जन 7.51.0 च्या APK teardown साठी शोधलं आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, .या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे. अद्याप हे फीचर युजरसाठी रोल आउट करण्यात आले नाही. या फीचरअंतर्गत युजर्स त्यांची सेल्फी निवडून कोणत्याही मीम टेम्पलेटसोबत जोडू शकतात. Google Photos चे AI इंजन युजर्सनी शेअर केलेल्या डेटाचा वापर करून एक यूनिक, मजेदार आणि सोशल मीडिया-फ्रेंडली मीम बनवणार आहे. Google द्वारे लीक झालेल्या एका ऑनबोर्डिंग टेक्स्टमध्ये असे लिहिले आहे की, तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांना तुमच्या आवडते मीममध्ये बदला.
फक्त एक टेम्प्लेट आणि एक आवडता फोटो निवडा आणि नवीन फीचरचा आनंद घ्या. हे मीम ग्रुप चॅट आणि इतर ठिकाणी शेअर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या फोटोपासून मीम बनवण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲप किंवा वेबसाईटची गरज असणार नाही. केवळ एक सेल्फी निवडा टेम्पलेट निवडा आणि गुगल फोटोज तुमचा सेल्फी व्हायरल मीममध्ये बदलणार आहे.
हे फीचर ऍक्टिव झाल्यानंतर युजर्सना वेगवेगळे मीम टेम्पलेट्स मिळणार आहे, जे एक्सप्रेशन, सिचुएशन किंवा पॉप कल्चर रेफरेंसवर आधारित असणार आहे. याशिवाय युजर्स त्यांचे स्वतःचे टेम्प्लेट डिझाइन देखील तयार करू शकतात. यानंतर गुगल फोटोचा AI तुमच्या चेहऱ्याला आणि बॅकग्राऊंडला ऑटो-एडजस्ट करून असा मीम तयार करेल जो सोशल मीडिया आणि ग्रुप चॅटवर शेअर करण्यासाठी एकदम परफेक्ट असणार आहे.
आता युजर्सना मीम बनवण्यासाठी एडिटिंग टूल्स किंवा Photoshop ची गरज असणार नाही. केवळ एक फोटो निवडून AI स्वतः मीम तयार करणार आहे. ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती कंटेंट क्रिएटर बनू शकणार आहे.
सध्या सोशल मीडिया आणि चॅट्स सर्वत्र मीम्सची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. ‘Me Meme’ फीचर लोकांमध्ये एक पर्सनलाइज्ड ह्यूमर घेऊन येणार आहे. सध्या गुगल फोटोने या नवीन फीचरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण जर ‘Me Meme’ लाँच झाले तर ते गुगल फोटोजला AI- पावर्ड क्रिएटिव्हीटी हब बनवू शकते.
Google Photos म्हणजे काय?
Google Photos हे Google द्वारे तयार केलेले क्लाउड-आधारित फोटो आणि व्हिडिओ स्टोरेज अॅप आहे, ज्यात तुम्ही तुमचे फोटो सुरक्षितपणे ठेवू शकता.
Google Photos मोफत आहे का?
होय, Google Photos बेसिक वापरासाठी मोफत आहे. मात्र, 15GB पर्यंत मोफत स्टोरेज दिलं जातं. त्यानंतर Google One सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं.
Google Photos मध्ये फोटो कसे सेव्ह होतात?
तुमचे फोटो आणि व्हिडिओ आपोआप तुमच्या Google अकाउंटवर क्लाउडमध्ये बॅकअप होतात.
Google Photos मधील फोटो कसे डिलीट करायचे?
तुम्ही अॅपमधून फोटो निवडा → “Delete” वर टॅप करा. क्लाउड आणि डिव्हाइस दोन्हीमधून हटवण्यासाठी “Free up space” वापरा.






