Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme C85 5G vs Nothing Phone 3a Lite: कसा आहे परफॉर्मन्स आणि कॅमेरा? तुमच्यासाठी बेस्ट कोण? जाणून घ्या

Realme vs Nothing: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा म्हटलं की लोकं लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये गोंधळलेले असतात. त्यांच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट ठरू शकतो, हे अनेकांना समजत नाही. यासाठी दोन स्मार्टफोनची तुलना करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 29, 2025 | 07:47 PM
Realme C85 5G vs Nothing Phone 3a Lite: कसा आहे परफॉर्मन्स आणि कॅमेरा? तुमच्यासाठी बेस्ट कोण? जाणून घ्या

Realme C85 5G vs Nothing Phone 3a Lite: कसा आहे परफॉर्मन्स आणि कॅमेरा? तुमच्यासाठी बेस्ट कोण? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?
  • तुमच्या गरजेनुसार करा फोनची निवड
  • 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान Nothing Phone 3a Lite ठरणार चांगला पर्याय
भारतीय स्मार्टफोन मार्केटसाठी नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कारण या आठवड्यात भारतात अनेक नवीन स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. भारतात Realme ने बजेट सेगमेंटमध्ये Realme C85 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्यामुळे बजेट सेगमेंट अधिक मजबूत झाले आहे. मोठी बॅटरी आणि ड्यूरेबिलिटीमुळे या स्मार्टफोनची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला स्टाईल आणि प्रीमियम फील पाहिजे असणाऱ्या यूजर्ससाठी Nothing ने Nothing Phone 3a Lite स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान एक चांगला पर्याय ठरणार आहे. तुम्ही जर या दोन्ही फोनमध्ये गोंधळले असाल तर आता आम्ही तुमचा गोंधळ दूर करणार आहोत.

Free Fire Max: प्लेअर्सना फ्री मिळणार जबरदस्त Target Practice इमोट, अनलॉक करण्यासाठी फॉलो करा स्टेप्स

1. डिझाइन आणि डिस्प्ले

लूकबद्दल बोलायचं झालं तर Nothing Phone 3a Lite हा स्मार्टफोन ट्रांसपेरेंट डिझाईन आणि Glyph Light सह लाँच करण्यात आला आहे, ज्यामुळे स्टाईल आणि लूकच्या बाबतीत हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच AMOLED स्क्रीन आहे, जो फुल एचडी+ रेजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला Realme C85 5G चा फोकस स्टाईल आणि लूकपेक्षा जास्त मजबूतीवर आहे. या स्मार्टफोनमध्ये IP69 रेटिंग दिली आहे, ज्यामुळे फोनला धूळ आणि पाण्यापासून जास्त सुरक्षा मिळते. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच LCD स्क्रीन दिली आहे, जी केवळ HD+ (720p) रेजॉल्यूशनला सपोर्ट करते. (फोटो सौजन्य – X) 

2. परफॉर्मेंस आणि सॉफ्टवेयर

परफॉर्मंसच्या बाबतीत Nothing Phone 3a Lite ने बाजी मारली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Dimensity 7300 Pro प्रोसेसर दिला आहे, यासोबतच याचा Nothing OS यूजर्सना अतिशय क्लीन एक्सपीरियंस ऑफर करतो. तर Realme C85 5G मध्ये मीडियाटेक Dimensity 6300 चिपसेट दिला आहे. गेमिंगसाठी हा स्मार्टफोन Nothing च्या तुलनेत काही प्रमाणात कमजोर असू शकतो. रियलमीचा फोन 4GB/6GB रॅम ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर, Nothing हा स्मार्टफोन 8GB रॅमसह लाँच करण्यात आला आहे.

3. कॅमेरा

दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल जाणून घेऊया. Nothing Phone 3a Lite स्मार्टफोन कॅमेऱ्याचा बाबतीत एक कंप्लीट पॅकेज असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे दिले आहेत. ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा (OIS सह), 8MP चा अल्ट्रा-वाइड आणि 2MP चा मॅक्रो लेंस यांचा समावेश आहे. हा सेटअप स्टेबिलिटी आणि चांगली क्वॉलिटीचे फोटो ऑफर करतो. सेल्फीसाठी यामध्ये 16MP चा कॅमेरा दिला आहे. Realme C85 5G मध्ये मागील बाजूला 50MP चा Sony IMX852 मुख्य कॅमेरा आहे. मात्र यामध्ये अल्ट्रा-वाइड लेंस दिलेली नाही. सेल्फीसाठी यामध्ये 8MP चा कॅमेरा दिला आहे.

तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या

4. बॅटरी आणि चार्जिंग

Realme C85 5G मध्ये 7,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 22 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देते असा दावा कंपनीने केला आहे. ज्यामुळे ज्या लोकांना सतत आपला फोन चार्ज करायला आवडत नाही, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन वरदान आहे. यामध्ये 45W चार्जिंग सपोर्ट देखील आहे. Nothing Phone 3a Lite मध्ये स्टँडर्ड 5,000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी सहज एक दिवस टिकेल, तरी ते Realme च्या तुलनेत कमी पडते. शिवाय, Nothing मध्ये बॉक्समध्ये चार्जर येत नाही, तर Realme मध्ये आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दोन्ही ब्रँड्समध्ये कॅमेरा क्वालिटीमध्ये फरक आहे का?

    Ans: Realme मध्ये कॅमेरा चांगला, परंतु Nothing मध्ये UI + फोटो प्रोसेसिंग थोडा वेगळा. जर कॅमेरा व व्हिडिओ महत्वाचा असेल, तर Realme चांगला पर्याय असू शकतो.

  • Que: परफॉर्मन्स/गेमिंगसाठी कोणता ब्रँड चांगला आहे?

    Ans: दोन्ही मध्ये चांगले प्रोसेसर असल्यामुळे परफॉर्मन्स छान मिळतो, पण Nothing मध्ये UI आणि सॉफ्टवेअर अनुभव अधिक स्मूथ असतो, ज्यामुळे रोजच्या वापरासाठी कमी अडचणी येतात.

  • Que: सॉफ्टवेअर अपडेट्स व सपोर्टमध्ये फरक?

    Ans: Nothing फोनला वेळोवेळी अपडेट मिळतो. Realme देखील अपडेट्स देतो, परंतु ब्रँड्सच्या मॉडेलनुसार फरक असू शकतो.

Web Title: Realme c85 5g vs nothing phone 3a lite how is the performance and camera of both smartphones know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • nothing
  • realme
  • smartphone

संबंधित बातम्या

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर
1

लवकरच भारतात लाँच होणार Poco X8 Pro सीरीज… फ्लिपकार्टवर लाईव्ह झाले लँडिंग पेज, जाणून घ्या सविस्तर

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…
2

काय सांगता! केवळ 5,999 रुपयांच्या किंमतीत नवा Ai+ स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल कॅमेरा आणि फीचर्स आहेत कमाल…

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश… 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज
3

TECNO ने पुन्हा केला धमाका! लेटेस्ट स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश… 6500mAh बॅटरी आणि अनोख्या कॅमेऱ्या फीचर्सने सुसज्ज

Redmi A7 Pro: 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
4

Redmi A7 Pro: 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.