तब्बल 7 हजार रुपयांनी महागणार लेटेस्ट iPhone 17 ची किंमत? का वाढतायत स्मार्टफोनच्या किंमती? कारण जाणून घ्या
अनेक मोठ्या अपग्रेडसह कंपनीने सप्टेंबर महिन्यात आयफोन 17 लाँच केला होता. याशिवाय बेस व्हेरिअंटमध्ये कंपनीने जास्त स्टोरेज देखील दिले आहे. आयफोन 16 सोबत तुलना केली तर कंपनीने नवीन आयफोन कमी किंमतीत लाँच केला होता. मात्र आता रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कंपनी पुन्हा एकदा आयफोन 17 ची किंमत वाढवू शकते. ही किंमत तब्बल 7 हजार रुपयांनी वाढणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 17 च्या 256GB बेस व्हेरिअंटची किंमत सध्या 82,900 रुपये आहे. तर या आयफोन मॉडेलचा 512GB व्हेरिअंट 1,02,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार, या दोन्ही आयफोन मॉडेलच्या किंमती 7 हजार रुपयांनी वाढवल्या जाऊ शकतात. जर कंपनीने खरंच किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला तर 256GB व्हेरिअंटची किंमत 89,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रुपये होणार आहे. यानंतर iPhone 17 च्या दोन्ही व्हेरिअंटची किंमत iPhone 16 च्या सेम स्टोरेज व्हेरिअंटच्या लाँच किंमतीएवढी होणार आहे. रिपोर्ट्सवप विश्वास ठेवला तर Apple खरेदीदारांना वेगळे बँक डिस्काऊंट ऑफर करणार आहे. कमी स्टॉक आणि जास्त मागणीमुळे कंपनी iPhone 17 ची किंमत वाढवण्याचा विचार करत आहे.
पुरवठा साखळीमुळे घटकांच्या किमती वाढत आहेत. याचा परिणाम अनेक स्मार्टफोनच्या किंमतीवर होणार आहे. मात्र आयफोनच्या किंमतीवर याचा परिणाम होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. स्मार्टफोन आणि कंप्यूटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या DRAM आणि मेमोरी चिप्सची सप्लाई चेन ग्लोबल मार्केटमध्ये प्रभावित आहे. याचा परिणाम मेमोरी चिप्सवर होऊन त्याच्या किंमत 20 ते 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, सॅमसंगने त्यांच्या चिप्सच्या किमतीत 60% पर्यंत वाढ केली आहे. वाढत्या घटकांच्या किमतींचा स्मार्टफोन उद्योगावर आधीच परिणाम झाला आहे.
कॉम्पोनेंटच्या वाढत्या किंमतींचा परिणाम भारतात लाँच करण्यात आलेल्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनवर होणार आहे. OnePlus 15 हा स्मार्टफोन भारतात 72,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यातच आला होता. तर हा स्मार्टफोन चीनमध्ये 50 हजार रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी कंपनीने OnePlus 13 लाँच केला होता ज्याची किंमत 69,999 रुपये होती. दुसरीकडे, iQOO 15 ची किंमत देखील भारतात 72,999 रुपये होती. गेल्या वर्षी कंपनीने iQOO 13 लाँच केला होता ज्याची किंमत 54,999 रुपये होती.
Ans: बहुतेक नवीन iPhone मॉडेल्सला Latest iOS अपडेट मिळते. जुन्या मॉडेल्सला Apple काही वर्षांपर्यंत अपडेट देत असते.
Ans: Settings → Battery → Battery Health & Charging मधून तुम्ही बॅटरीची स्थिती पाहू शकता.
Ans: होय, बहुतेक मॉडेल्स 20W किंवा अधिक वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट करतात.






