Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

Realme Smartphone Launched: कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच AMOLED डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. याचा मुख्य सेंसर 50-मेगापिक्सेलचा आहे. तसेच यामध्ये IP66+IP68+IP69 रेटिंग आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 23, 2026 | 11:09 AM
Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

Realme Neo 8: अखेर तो क्षण आलाच! 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये स्मार्टफोनची एंट्री, वाचा फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरी
  • Realme Neo 8 स्नॅपड्रॅगन 8 जनरल 5 चिपसेटने सुसज्ज
  • कंपनीने लाँच केलेल्या या हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
चीनमध्ये गुरुवारी Realme Neo 8 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. Oppo च्या उपकंपनीने लाँच केलेला हा लेटेस्ट Neo सीरीज स्मार्टफोन तीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Realme च्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Realme Neo 8 स्नॅपड्रॅगन 8 जनरल 5 चिपसेटने सुसज्ज आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी AI सुद्धा ऑन ड्युटी! दिल्ली पोलीस करणार स्मार्ट ग्लासेसचा वापर, अशी पटणार संशयितांची ओळख

Realme Neo 8 ची किंमत आणि उपलब्धता

Realme Neo 8 हा स्मार्टफोन 12GB+256GB स्टोरेज, 16GB+256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB, आणि 16GB + 1TB या रॅम आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 35,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 3,699 म्हणजेच सुमारे 48,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस चीनमध्ये साइबर पर्पल, मेक ग्रे आणि ओरिजिन व्हाइट रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Realme Neo 8 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डुअल सिम (नॅनो+नॅनो) Realme Neo 8 अँड्रॉईड 16 वर बेस्ड Realme UI 7.0 वर चालतो आणि यामध्ये 6.78-इंच फुल-HD+ (1,272×2,772 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सैंपलिंग रेट आहे. सॅमसंगच्या M14 मटीरियलने तयार करण्यात आलेल्या या डिस्प्लेमध्ये 3,800 निट्सपर्यंत ब्राइटनेस देण्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 जनरल 5 चिपसेट आहे, ज्याला 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसोबत जोडण्यात आले आहे.

कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या या हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये OIS सह 50-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि OIS सह 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. Realme Neo 8 मध्ये ऑथेंटिकेशनसाठी अल्ट्रासॉनिक 3D फिंगरप्रिंट सेंसरस आहे. यामध्ये स्क्रॅच आणि पडल्यानंतर वाचवण्यासाठी क्रिस्टल आर्मर ग्लास आहे. यामध्ये चांगल्या सिग्नल लोकेशन ऑप्टिमाइजेशनसाठी स्काई सिग्नल चिप S1 आहे. Realme चं असं म्हणणं आहे की, हँडसेटला तीन मोठे अँड्रॉईड वर्जन अपडेट आणि चार वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे.

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

Realme Neo 8 च्या कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये ब्लूटूथ 6.0, 5G, बेईडौ, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस, यूएसबी टाइप-C पोर्ट आणि वायफाय 7 समाविष्ट आहे. यामध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, कलर टेम्परेचर सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल सारखे सेंसर आहेत. यामध्ये IP66+IP68+IP69 रेटेड बिल्ड आहे आणि हे डुअल स्टीरियो स्पीकरने सुसज्ज आहे. Realme Neo 8 मध्ये 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी बाइपास चार्जिंगला सपोर्ट करते. याची जाडी 8.30mm आहे आणि वजन 215 ग्रॅम आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Realme हा कोणत्या देशाचा ब्रँड आहे?

    Ans: Realme हा चीनमधील स्मार्टफोन ब्रँड आहे. सुरुवातीला तो Oppo चा सब-ब्रँड होता, आता स्वतंत्र ब्रँड आहे.

  • Que: Realme फोन भारतात बनतात का?

    Ans: होय. Realme चे अनेक स्मार्टफोन्स Make in India अंतर्गत भारतातच तयार होतात.

  • Que: Realme फोनमध्ये कोणता OS असतो?

    Ans: Realme फोनमध्ये Realme UI (Android आधारित) ऑपरेटिंग सिस्टिम असते.

Web Title: Realme neo 8 launched in china smartphone is equipped with 8000mah battery and 80w fast charging support tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

CYBX Super App: आता स्मार्टफोन होणार अधिक सुरक्षित!  १० लाखांच्या विम्यासह ‘CYBX’ सायबर सुरक्षा ॲप लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
1

CYBX Super App: आता स्मार्टफोन होणार अधिक सुरक्षित! १० लाखांच्या विम्यासह ‘CYBX’ सायबर सुरक्षा ॲप लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? किती वर्षांनी फोन बदलावा? जाणून घ्या एका क्लिकवर
2

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? किती वर्षांनी फोन बदलावा? जाणून घ्या एका क्लिकवर

प्रीमियम साउंडचा अनुभव! मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme Buds Air 8 लाँच; प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार बॅटरी
3

प्रीमियम साउंडचा अनुभव! मिड-रेंज सेगमेंटमध्ये Realme Buds Air 8 लाँच; प्रीमियम फीचर्ससह मिळणार दमदार बॅटरी

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
4

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.