Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का
Red Magic 11 Air स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB आणि 16GB + 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंट 12GB + 256GB ची किंमत CNY 3,699 म्हणजेच सुमारे 48,300 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,399 म्हणजेच सुमारे 57,500 रुपये आहे. रेडमॅजिकचा हा नवीन स्मार्टफोन क्वांटम ब्लॅक आणि स्टारडस्ट व्हाइट शेड्स या रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, हा फोन मार्च महिन्यात अरोरा सिल्व्हर रंगात देखील लाँच केला जणार आहे. (फोटो सौजन्य – X)
AIR. Redefined.
REDMAGIC 11 Air is on its way.https://t.co/MTcIWM715z pic.twitter.com/8xKTW97SdV — REDMAGIC (@redmagicgaming) January 20, 2026
Red Magic 11 Air स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच 1.5K (2,688×1,216 पिक्सेल) फुल-स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. यामध्ये 95.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ आहे. या फोनची डिस्प्ले स्टार शील्ड आई प्रोटेक्शन टेक्नोलॉजी 2.0, 2,592Hz PWM डिमिंग, DC डिमिंग आणि SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनला सपोर्ट करते. टच रिस्पॉन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये मॅजिक टच 3.0 टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
Red Magic 11 Air स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 SoC दिला आहे. गेमिंग परफॉर्मंस अधिक सुधारावा यासाठी या फोनमध्ये कंपनीने कस्टम रेडकोर R4 गेमिंग चिप दिला आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x अल्ट्रा रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित रेडमॅजिक OS 11.0 वर चालतो.
Red Magic 11 Air मध्ये कंपनीने क्यूब स्काय इंजिन 3.0, प्रोफेशनल शोल्डर ट्रिगर बटन दिलं आहे, ज्याचा टच सँपलिंग रेट 520Hz आहे. यासोबतच फोनमध्ये बायपास चार्जिंग सपोर्ट आणि बिल्ट-इन पीसी एमुलेटर दिले आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी या स्मार्टफोनमध्ये आईस मॅजिक कूलिंग सिस्टम, डुअल एक्टिव कूलिंग फॅन, एक्ट्रा-थिक आइस ग्रेड वेपॉर चेंबर, ग्रेफीन कॉपर फॉइल आणि विंड चेजर 4.0 सेटअप दिला आहे.
Red Magic 11 Air मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो अंडर डिस्प्ले कॅमेरा सेंसर असणार आहे.
Red Magic 11 Air स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. Red Magic 11 Air मध्ये कंपनीने 3D माइक्रो-आर्क ग्लास बॅक आणि ट्रांसपेरेंट डिझाईन थीम दिली आहे.
Ans: होय. अनेक मॉडेल्स भारतात ऑफिशियली किंवा आयात मार्गे उपलब्ध आहेत.
Ans: Red Magic फोनमध्ये फॅन-बेस्ड कूलिंग / मोलिक्युलर कूलिंग / फ्लिड कूलिंग यांसारखी अत्याधुनिक सिस्टीम असते ज्यामुळे जास्त वेळ गेमिंगही गरम न होता चालते.
Ans: गेमिंग फोन असल्यामुळे मोठी बॅटरी (5000mAh+) आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो — ज्यामुळे गेमिंगचा अनुभव सातत्याने चालू राहतो.






