Realme P3 Ultra: लवकरच भारतात लाँच होणार तगडा स्मार्टफोन, एक्सपेक्टेड फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
स्मार्टफोन कंपनी Realme ने अलीकडेच त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Realme P3 भारतात लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीज अंतर्गत Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. आता कंपनी या सिरीजअंतर्गत आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Realme P3 Ultra या नावाने लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन याच महिन्यात भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी Realme P3 Ultra स्मार्टफोन P-सिरीजचा एक भाग असणार आहे. कंपनीने त्यांची P-सिरीज नुकतीच भारतात लाँच केली होती. आता एक नवीन स्मार्टफोन या सिरीजमध्ये अॅड केला जाणार आहे. आगामी स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र आगामी स्मार्टफोन याच महिन्यात लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे. या आगामी स्मार्टफोनबाबत Realme च्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट देखील शेअर करण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य – X)
The ULTRA experience is on its way! Ready to SLAY? ⚡#realmeP3Ultra5G #SLAYTheUltraWay pic.twitter.com/4Iw9Mj63Cf
— realme (@realmeIndia) March 7, 2025
Not one, not two, but a TRIPLE THREAT. Brace for the ULTRA revolution⚡#realmeP3Ultra5G #SLAYTheUltraWay pic.twitter.com/1kJ1glwf4e
— realme (@realmeIndia) March 7, 2025
Realme P3 Ultra स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. हा Realme फोन आधीच BIS वेबसाइटवर दिसला आहे. या स्मार्टफोनच्या नावात जोडलेल्या अल्ट्रा या शब्दावरून असे दिसून येते की हा या सिरीजमधील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन असेल. फोनची टीझिंग करताना, Realme ने म्हटले आहे की आगामी स्मार्टफोन अल्ट्रा डिझाइन, अल्ट्रा परफॉर्मन्स आणि अल्ट्रा कॅमेरासह लाँच केला जाईल. यासोबतच, हा Realme फोन कोणत्याही तडजोडशिवाय स्पीड आणि परफॉर्मंस देईल.
सध्या, येणाऱ्या Realme P3 Ultra स्मार्टफोनच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल काही माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत याबद्दल अधिक माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जी कंपनी अधिकृतपणे शेअर करण्याची शक्यता आहे.
Realme P3 Ultra स्मार्टफोन नुकताच Geekbench वर लिस्ट करण्यात आला आहे. Geekbench लिस्टिंगनुसार, हा फोन MediaTek Dimensity 8350 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि Android 15 सह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
Realme P3 Ultra स्मार्टफोनबाबत दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की हा फोन ग्लॉसी बॅक पॅनलसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन ग्रे रंगाच्या पर्यायात देखील आणला जाऊ शकतो. Realme च्या आगामी स्मार्टफोनबद्दल अशी अटकळ आहे की हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन दोन किंवा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
Realme P3 Ultra स्मार्टफोन कंपनीच्या P सीरीज लाइनअपचा भाग आहे. कंपनीने या सिरीजमधील दोन स्मार्टफोन, Realme P3x आणि Realme P3 Pro आधीच लाँच केले आहेत. हे दोन्ही फोन भारतात अनुक्रमे 13,999 आणि 23,999 रुपयांना लाँच करण्यात आले आहेत. Realme P3 Ultra ची किंमत Realme P3x आणि Realme P3 Pro पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे आणि त्यात चांगले स्पेसिफिकेशन देखील असण्याची अपेक्षा आहे.