Moto ने उडवली सर्वांची झोप! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच, बजेट किंमत आणि दमदार बॅटरीने सुसज्ज...
यूकेमध्ये Moto G67 ची किंमत GBP 199.99 म्हणजेच सुमारे 25,400 रुपये आहे. कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 4GB + 128GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. हा फोन पँटोन आर्कटिक सील आणि पँटोन नाइल कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर Moto G77 स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत GBP 250 म्हणजेच सुमारे 31,700 रुपये आहे. हा डिव्हाईस पँटोन शेडेड स्प्रूस आणि पँटोन ब्लॅक ऑलिव फिनिशमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन EMEA देशातील मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे खरेदी केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – X)
Moto G67 आणि Moto G77 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच एक्सट्रीम AMOLED डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर डेप्थ, 100 परसेंट DCI-P3 कलर गॅमट आणि 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने प्रोटेक्टेड आहे आणि यामध्ये SGS लो ब्लू लाइट आणि लो मोशन ब्लर सर्टिफिकेशन आहे. Moto G67 स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरवर आधारित आहे तर Moto G77 मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेटने सुसज्ज आहे. G67 मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, ज्यामध्ये 2TB पर्यंत माइक्रोएसडी सपोर्ट आहे. तर G77 मध्ये 8GB रॅम आणि समान स्टोरेज आणि माइक्रोएसडी एक्सपांशन देण्यात आले आहे. दोन्ही फोन अँड्रॉईड 16-बेस्ड Hello UI वर आधारित आहेत आणि यामध्ये फिंगरप्रिंट रीडर, फेस अनलॉक आणि थिंकशील्ड प्रोटेक्शन जसे सिक्योरिटी फीचर्स समाविष्ट आहेत.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Moto G67 मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-600 मेन सेंसर आहे, ज्यासोबत 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड शूटर देण्यात आला आहे. Moto G77 मध्ये 3x लॉसलेस झूमसह 108-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस आहे. दोन्ही फोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसेसमध्ये नाइट विजन, पोर्ट्रेट मोड, प्रो मोड, ऑटो स्माइल कॅप्चर, गूगल लेंस इंटीग्रेशन आणि 2K व्हिडीओ रेकॉर्डिंग समाविष्ट आहे. Moto G67 आणि Moto G77 मध्ये ऑडियो फीचर्समध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टवाले स्टीरियो स्पीकर, डुअल माइक्रोफोन आणि USB टाइप-C ऑडियो आउटपुट समाविष्ट आहे.
१४ कोटींहून अधिक युजर्सचे पासवर्ड लीक, तुमचे Gmail अकाउंट धोक्यात? सुरक्षेसाठी फॉलो करा या स्टेप्स
Moto G67 आणि Moto G77 या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोरोलाने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंंतर बॅटरी संपूर्ण दिवस वापरली जाऊ शकते. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये 5जी, वाय-फाय एसी, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, बीडौ, क्यूझेडएसएस आणि फिजिकल नॅनो सिम आणि ईएसआयएमसह ड्युअल सिम सपोर्ट समाविष्ट आहे. Moto G77 अधिक 5G बँडना देखील सपोर्ट करतो.
Ans: Motorola ही मूळची अमेरिकन कंपनी आहे. सध्या ती Lenovo Group (चीन) अंतर्गत कार्यरत आहे.
Ans: होय, Motorola चे अनेक स्मार्टफोन भारतात Make in India अंतर्गत तयार केले जातात.
Ans: बहुतांश Motorola फोनला 1–2 Android OS अपडेट्स आणि 3 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स मिळतात (मॉडेलनुसार बदलू शकते).






