
Samsung Galaxy A18 4G लॉन्च! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
4GB रॅम आणि 128GB स्टोरेज फ्रान्समध्ये हा फोन एकाच व्हेरिएंटमध्ये आला आहे. त्यांची किंमत 279 युरो म्हणजेच भारताच्या पैशात जवळपास 30,900 रुपये इतकी असून पाहायला गेलं तर, हा फोन थोडा महाग असला तरी फिचर्स पाहता किंमत कमी आहे. काळा, ग्रे आणि हलका निळा या तीन रंगामध्ये हा फोन उपलब्ध आहे. तिन्ही रंग दिसायला एकदम क्लास आहेत. Samsung Galaxy A18 4G
या फोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. तो पण साधा नाही तर Super AMOLED. म्हणजे व्हिडिओ बघताना किंवा गेम खेळताना कलर एकदम भारी दिसतील. यात FHD+ रेझोल्यूशन आहे आणि 90Hz रिफ्रेश रेट. त्यामुळे फोन वापरताना अजिबात अडकणार नाही, स्क्रोलिंग एकदम स्मूथ होईल.कॅमेरा पण जबरदस्तमागच्या बाजूला दोन-तीन कॅमेरे आहेत. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, त्यामुळे फोटो एकदम क्लिअर येतील. त्याच्यासोबत 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा पण आहे, ज्याने मोठे फोटो काढता येतील आणि 2 मेगापिक्सेलचा एक छोटा सेन्सर पण आहे.पुढच्या बाजूला सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा कॅमेरा पुरेसा आहे.
या फोनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे याचं सॉफ्टवेअर. यात Android 17 वर आधारित OneUI 9.0 दिलं आहे. आणि Samsung ने सांगितलं आहे की या छोट्या फोनला पण ते 6 वर्ष OS आणि सिक्युरिटी अपडेट देतील. हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण एवढ्या कमी किमतीच्या फोनमध्ये एवढे अपडेट कोणीच देत नाही. यात Gemini AI चे फीचर्स पण दिले आहेत, त्यामुळे तुमचं काम अजून सोपं होईल.
या फोनमध्ये Samsung चाच Exynos 1610 चिपसेट वापरला आहे. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, त्यामुळे रोजच्या वापरात फोन हँग होणार नाही. यात 4GB रॅम आणि 128GB मेमरी आहे. जर मेमरी कमी पडली तर तुम्ही मेमरी कार्ड टाकून ती 2TB पर्यंत वाढवू शकता.बॅटरी 5000mAh ची आहे, एकदा चार्ज केला की दिवसभर आरामात चालेल. आणि 25W फास्ट चार्जिंग पण आहे, त्यामुळे लवकर चार्ज होईल.पाण्यापासून आणि धुळीपासून वाचवण्यासाठी IP64 रेटिंग पण दिलं आहे. Wi-Fi 5, Bluetooth 5.3, NFC आणि Type-C चार्जिंग पोर्ट सगळं काही आहे.एकंदरीत बघायला गेलं तर कमी पैशात चांगला फोन पाहिजे असेल तर Galaxy A18 4G एक चांगला ऑप्शन आहे.