
स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आपल्या फ्लॅगशिप ‘गॅलेक्सी एस२६’ सिरीजचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित ‘गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६’ ची अधिकृत घोषणा केली असून, या तंत्रज्ञान सोहळ्यात गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन डिवाईस २७ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक स्तरावर अनावरण केले जाईल.
गॅलेक्सी एस२६ सिरीजने बाजारात आल्यापासूनच आपल्या अत्यंत प्रगत एआय वैशिष्ट्यांनी आणि उच्च दर्जाच्या कॅमेरा सेटअपमुळे युजर्सच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. दैनंदिन जीवनात उत्तम दर्जाचे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अनुभवणे, सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करणे आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा वापर करणे यामुळे अधिक सोपे झाले आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि नवीन बदल:
लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहावे?
हा बहुप्रतिक्षित टेक इव्हेंट भारतीय वेळेनुसार २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता (केएसटी वेळेनुसार रात्री ९:०० वाजता) थेट प्रसारित केला जाईल.लाइव्ह पाहण्यासाठी प्लॅटफॉर्म्स: सॅमसंगची अधिकृत वेबसाईट आणि सॅमसंगचे यूट्यूब चॅनेल.
तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी आणि विशेषतः प्रीमियम स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी हा इव्हेंट अत्यंत खास ठरणार असून, यात गॅलेक्सी एस२६ मधील नवीन मॉडेलच्या किमती आणि उपलब्धतेबद्दलची अधिकृत माहिती उघड केली जाईल.