
Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर
Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
भारतात सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 8 ची अधिकृत किंमत 1,24,999 रुपये आहे. मात्र हा स्मार्टफोन सॅमसंग वेबसाईटवर 1,14,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. तसेच, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर देखील सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 8 ची किंमत 1,14,999 रुपये आहे. मात्र ॲमेझॉन या स्मार्टफोनच्या खरेदीवर आणखी डिस्काऊंट ऑफर करत आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. ॲमेझॉन 10,000 रुपयांचे डायरेक्ट कूपन डिस्काऊंट देत आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
तसेच, स्मार्टफोनवर क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआई ट्रांजेक्शनवर 4,000 रुपयांचे इंस्टंट बँक डिस्काऊंट देखील मिळणार आहे. या सर्व ऑफर्सनंतर ॲमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 8 ची किंमत केवळ 1,00,999 रुपये होणार आहे. कूपन डिस्काऊंट मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे.
आणखी बचत करण्यासाठी जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. तुमच्या जुन्या फोनचा ब्रँड आणि स्थिती यानुसार, तुम्ही 42,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकता. या सर्व ऑफर्सव्यतिरिक्त या फोनसाठी दरमहा 4,043 रुपयांपासून सुरू होणारे ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत. तुम्हाला या ऑफर्सअंतर्गत स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी घाई करावी लागणार आहे. कारण सहसा अशा ऑफर्स केवळ मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 8 मध्ये 6.9-इंच का एफएचडी+ डायनॅमिक अमोलेड 2X मेन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz चा अडाप्टिव रिफ्रेश रेट आणि विजन बूस्टर सपोर्टसह येतो. फोनचा बाहेरील कव्हर डिस्प्ले 4.1 इंचाचा आहे. परफॉर्मंससाठी या डिव्हाईसमध्ये एक्सिनोस 2600 चिपसेट देण्यात आला आहे, ज्यासोबत 12GB रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. याशिवाय, या फ्लिप-स्टाईल फोल्डेबलमध्ये 4,300mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉईड 17 वर चालतो.
BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर
स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य प्रायमरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 10 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.