Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना... या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी
कंपनीने स्मार्टफोनच्या लाँचिंगची तयारी केली पण कंपनी स्मार्टफोन सिरीजची किंमत ठरवू शकत नाही. कंपनीला या आगामी स्मार्टफोनची किंमत ठरवताना अनेक समस्या येत आहेत. रिपोर्टनुसार, मेमोरी चिप आणि दूसरे पार्ट्स प्रचंड महाग झाले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन सिरीज तयार करण्यासाठी सॅमसंगला देखील जास्तीचा खर्च करावा लागत आहे. मेमोरी चिपच्या वाढत्या किंमती आणि स्मार्टफोन तयार करण्याचा खर्च वाढल्यामुळे आगामी Galaxy S26 लाइनअपची किंमत देखील वाढणं अगदी सहाजिक आहे. मात्र कंपनीला या स्मार्टफोन सिरीजच्या किंमतीमध्ये वाढ करायची नाही. स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्यामुळे विक्रीवर परिणाम होतो. मात्र जर किंमत वाढवली नाही तर कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकतं, ज्यासाठी कंपनीचा नकार आहे. याच समस्येमुळे आगामी Galaxy S26 लाइनअपची किंमत नक्की किती ठेवावी, असा प्रश्न कंपनीसमोर निर्माण झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलीकडेच एक रिपोर्टसमोर आली आहे, ज्यामध्ये असं सांगितलं आहे की, सॅमसंग त्यांचा पहिला ट्रायफोल्ड स्मार्टफोन Galaxy Z TriFold ची तोट्यात विक्री करत आहे. खरं तर हा स्मार्टफोन तयार करण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे. मात्र या स्मार्टफोनची विक्री अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीला गॅलेक्सी S26 सीरीजसोबत ही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे फोनची किंमत ठरवताना कंपनीला अडचणी येत आहे. फोन तयार करण्याचा खर्च वाढल्याने आता सॅमसंग आगामी गॅलेक्सी S26 सीरीजच्या किमतीबाबत आणखी चर्चेत आहे. त्यामुळे असं सांगितलं जात आहे की, स्मार्टफोनची किंमत ठरवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. ज्यामुळे स्मार्टफोनचे लाँच देखील उशीरा होऊ शकते.
मेमोरी चिप्सच्या किंमती पुढील वर्षी सुमारे 30 ते 40 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, कंपनी तिच्या एक्सिनोस चिपसेटवर अवलंबून राहू शकत नाही आणि क्वालकॉमकडून स्नॅपड्रॅगन प्रोसेसर खरेदी करण्यासाठी तिला अधिक पैसे मोजावे लागतील. तसेच OLED डिस्प्लेच्या किंमती देखील वाढल्या आहेत. यामुळे कंपनीला स्मार्टफोन तयार करण्यासाठी देखील मोठा खर्च करावा लागत आहे.






