टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं '2025' चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क
टेक जायंट कंपनी अॅपलने यावर्षी त्यांचा पहिला सर्वात स्लिम आयफोन लाँच केला. हा आयफोन एअर या नावाने लाँच करण्यात आला. तर स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने त्यांचा पहिला ट्राय फोल्ड फोन लाँच केला. एवढंच नाही तर अनेक कंपन्यांनी एआय स्मार्टफोन्स लाँच करण्यावर देखील भर दिला. टेक कंपन्यांनी लाँच केलेल्या स्मार्टफोनचे फीचर्स पूर्वीपेक्षा अधिक प्रगत झाले. आता फोन फक्त कॉलिंग किंवा मेसेजिंगसाठी नाही तर एखाद्या एआय असिस्टंटसारखे वापरले जात आहेत. कॅमेरा क्वालिटी सुधारल्यामुळे लोकांमध्ये स्मार्टफोन फोटोग्राफीची वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॅटजीपीटी, गुगल जेमिनी, मेटा एआयने लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. एकेकाळी एआय म्हणजे काय हेदेखील माहिती नसणारे यूजर्स आता त्यांच्या प्रत्येक कामासाठी एआय मॉडेल्सवर अवलंबून आहेत. अगदी मेसेज लिहिणे, अभ्यास, ऑफिसची कामं, फोटो-व्हिडिओ एडिटिंग सर्व कामांसाठी एआयची मदत घेतली जात आहे. एआयमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे, यात काही शंकाच नाही.
एलन मस्कच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने यावर्षी ऑप्टिमस नावाचा एक रोबोट जगासमोर सादर केला. हा रोबोट अतिशय खास मानला जात आहे, कारण हा रोबोट माणसासारखा चालतो, वस्तू उचलतो आणि अनेक कामं करू शकतो. या रोबोटमध्ये टेस्लाने भविष्यातील एक झलक दाखवली आहे.
Year Ender 2025: रोलेबल लॅपटॉपपासून स्लिम आयफोनपर्यंत… यावर्षी लाँच झाले हे युनिक गॅजेट्स
जगभरातील इंटरनेट सेवा अधिक वेगवान व्हावी, यासाठी 2025 मध्ये प्रयत्न करण्यात आले. याशिवाय स्कॅम आणि सायबर गुन्हेगारांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी सायबर सिक्युरिटी देखील वाढवण्यात आली. लोकांमध्ये ओटीपी, पासवर्ड, एआय फसवणूक याबद्दल जागरूकता पसरवण्यात आली.
इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती कमी झाल्या आणि रेंज वाढली. त्यामुळे 2025 मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी अधिक वाढली. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये फास्ट चार्जिंग देखील जोडण्यात आली.
रोबोट्स, स्मार्टफोन, एआय एवढंच घडलं का? तर नाही. स्मार्ट चष्मे, हेल्थ ट्रॅकिंग डिव्हाईस, स्मार्ट वॅक्यूम क्लीनर, स्मार्टवॉच या सर्व गॅझेट्मध्ये भविष्याची झलक पाहायला मिळाली. 2025 मध्ये असे काही बदल झाले आणि काही असे खास गॅझेट्स लाँच करण्यात आले ज्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यापासून अगदी घरातील कामं करण्यापर्यंत आता तंत्रज्ञानामुळे सर्वकाही शक्य झालं आहे.






