
Samsung Galaxy Z TriFold: अखेर तो क्षण आलाच! सॅमसंगने या देशात सादर केला पहिला ट्राय-फोल्ड फोन,किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज असणाऱ्या फोनची स्क्रीन अनफोल्ड केल्यानंतर 10 इंच डिस्प्ले ऑफर करते. हा फोन अनफोल्ड केल्यानंतर प्रत्येक स्क्रीनवर वेगवेगळे अॅप्स वापरले जाऊ शकतात. म्हणजेच यूजर्स 6.5 इंचाच्या तीन स्क्रीनवर वेगवेगळी काम करू शकणार आहेत. या डिव्हाईससाठी सॅमसंगने DeX सॉफ्टवेयरमध्ये थोडा बदल केला आहे, ज्याच्या मदतीने स्मार्टफोनवर डेस्कटॉप वर्जनचा आनंद घेतला जाऊ शकतो. DeX मोडमध्ये हा फोन चार वेगवेगळ्या वर्कस्पेसप्रमाणे काम करणार आहे आणि प्रत्येक वर्कस्पेससह 5 अॅप्स चालवले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – X)
Samsung has officially unveiled the Galaxy Z Trifold. Specifications, Price, Availability:
⚙️ Snapdragon 8 Elite for Galaxy
📱 10-inch Dynamic AMOLED 2X unfolded display, 120Hz (2160×1584), up to 1600 nits
🪟 6.5-inch Dynamic AMOLED 2X cover display, 120Hz (2520×1080), up to… pic.twitter.com/kWwkuLUb5c — Abhishek Yadav (@yabhishekhd) December 2, 2025
या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP चा 3X टेलीफोटो सेंसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5,600 च्या बॅटरी सपोर्टसह लाँच केला जाणार आहे. ही आतापर्यंतच्या फोल्डेबल स्मार्टफोनमधील सर्वात मोठी बॅटरी असणार आहे.
सॅमसंगमने सांगितलं आहे की, कंपनीने फोनच्या टाइटॅनियम हिंज, एल्युमिनियम फ्रेम आणि डिस्प्ले टेक्नोलॉजीला रिफाइन केले आहे, ज्यामुळे हा ट्राय फोल्ड स्मार्टफोन यूजर्सना लॉन्ग-टर्म ड्यूरॅबिलिटी ऑफर करू शकणार आहे. गरज असेल तेव्हा कंपनी पहिल्यांदा डिस्प्ले दुरुस्त करण्यावर 50 टक्के डिस्काऊंट देखील ऑफर करणार आहे. याशिवाय, जर एखादा यूजर हा ट्राय फोल्ड स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला नोटिफिकेशन आणि स्क्रीन वाइब्रेशनद्वारे अलर्ट पाठवले जाणार आहे.
दक्षिण कोरियामध्ये हा स्मार्टफोन 2,450 अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 2.20 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतर देशांमध्या या स्मार्टफोनची किंमत किती असेल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. 12 डिसेंबर रोजी लाँच झाल्यानंतर या स्मार्टफोनची किंमत आणि इतर माहिती समोर येईल.
Ans: हा सॅमसंगचा पहिलाच ट्राय-फोल्ड स्मार्टफोन आहे जो तीन भागांमध्ये फोल्ड होतो. यात टॅब्लेटसारखी मोठी स्क्रीन आणि कॉम्पॅक्ट फोन दोन्हीचे फायदे मिळतात.
Ans: यात तीन स्वतंत्र्य हिंज वापरले आहेत ज्यामुळे स्क्रीन Z-शेपमध्ये फोल्ड होते. त्यामुळे डिव्हाइस फोन → फोल्डेड टॅब → पूर्ण टॅब्लेट अशा तीन मोडमध्ये वापरता येतो.
Ans: हे प्रीमियम कॅटेगरी डिव्हाइस असल्यामुळे किंमत सामान्य फोल्डेबल्सपेक्षा जास्त आहे.