Samsung च्या लेटेस्ट स्मार्टफोनची भारतात एंंट्री, 5000mAh बॅटरी आणि असे आहेत दमदार फीचर्स; किंमत 25 हजारांहून कमी
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वी त्यांची बजेट फ्रेंडली सिरीज लाँच केली होती. या सिरीजअंतर्गत कंपनीने Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 हे स्मार्टफोन लाँच केले होते. आता या सिरीजमधील Samsung Galaxy A26 5G स्मार्टफोन भारतात देखील लाँच करण्यात आला आहे. Samsung Galaxy A26 5G हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असून कंपनीच्या A-सिरीज लाइनअपचा भाग आहे. या स्मार्टफोनची किंमत 25 हजारांहून कमी आहे. त्यामुळे तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनीच्या A-सिरीज लाइनअपचा भाग असलेला Samsung Galaxy A26 5G स्मार्टफोन सर्वोत्तम पर्याय असणार आहे.
सॅमसंगच्या नवीनतम Galaxy A26 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 1,000 निट्स आहे, जी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ प्रोटेक्शनसह येते. (फोटो सौजन्य – X)
या सॅमसंग फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी U-आकाराचा नॉच आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आहे. रियर कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. जे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करते. यासोबतच, फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. या सॅमसंग फोनमध्ये एक्सिनोस 1380 प्रोसेसर आहे, जो कंपनीने गॅलेक्सी Galaxy A35 स्मार्टफोनमध्ये दिला होता.
हा सॅमसंग फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.
सॅमसंगने या बजेट फोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 25W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित One UI 7 वर चालतो. कंपनीचे म्हणणे आहे की या फोनला 6 वर्षांसाठी अपडेट्स मिळतील.
या नव्या फोनमध्ये सॅमसंगचे सर्कल टू सर्च आणि ऑब्जेक्ट इरेजर सारखे एआय फीचर्स देखील उपलब्ध असतील. याला IP67 रेटिंग आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, स्टीरिओ स्पीकर्स आणि संपर्करहित पेमेंटसाठी NFC सपोर्ट यांचा समावेश आहे.
Galaxy A26 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. हा फोन ऑसम ब्लॅक, मिंट, व्हाईट आणि पीच कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्ट, सॅमसंगची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. लाँच ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, HDFC आणि SBI क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची त्वरित सूट उपलब्ध आहे.