Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली 'या' स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
तुम्ही स्टँडर्ड गॅलेक्सी एस 26 खरेदी करण्याचा विचार करा किंवा टॉप-एंड गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा… तुम्हाला लाँच किंमतीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सॅमसंग स्मार्टफोन सिरीज खरेदी करण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंग गॅलेक्सी एस 26 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,02,999 रुपये झाली आहे. हे स्मार्टफोन व्हेरिअंट कंपनीने 87,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. याचा अर्थ या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत थेट 15,000 रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. तसेच, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,22,999 रुपये झाली आहे. तर हे व्हेरिअंट 1,07,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते.
सॅमसंग गॅलेक्सी एस 26 प्लसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,34,999 रुपये झाली आहे. तर हे व्हेरिअंट 1,19,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. याचा अर्थ या व्हेरिअंटची किंमत देखील 15,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 1,39,999 रुपये नाही तर तब्बल 1,54,999 रुपये मोजावे लागणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,54,999 रुपये झाली आहे. तर या डिव्हाईसची लाँच किंमत 1,39,999 रुपये होती. डिव्हाईसच्या 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 1,74,999 रुपये झाली आहे. याची किंमत पूर्वी 1,59,999 रुपये होती.
16GB रॅम आणि 1TB स्टोरेज असलेल्या टॉप-एंड व्हेरिअंटची किंमत 2,14,999 रुपये झाली आहे. हे व्हेरिअंट 1,89,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. याचा अर्थ कंपनीने या व्हेरिअंटच्या किंमतीत 25,000 रुपयांची वाढ केली आहे.






