
Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
मेमरी आणि स्टोरेज डिव्हाईसच्या वाढत्या खर्चामुळे, कंपनीने 2028 पर्यंत किमतीत आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर संजू चौधरी नावाच्या टिप्स्टरने असा दावा केला आहे की, दक्षिण कोरियातील कंपनीचे हे दोन्ही फोन लाँच किंमतीपेक्षा 6,000 रुपयांपर्यंत महाग झाले आहे. सॅमसंगच्या या नव्या किंमती 7 सप्टेंबर 2026 पासून लागू झाल्या आहेत. कंपनीने या दोन्ही फोन्सच्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य: Samsung)
Price hike alert 🚨
Samsung increases the price of their smartphones by upto ₹6k: A57:
8/256GB: ₹59,999 → ₹62,999
12/256GB: ₹67,499 → ₹72,499 A37:
8/128GB: ₹43,999 → ₹46,999
8/256GB: ₹50,499 → ₹54,499
12/256GB: ₹57,999 → ₹63,999 Are you still waiting for BBD… pic.twitter.com/Dzmy3pSx7y — Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) September 7, 2026
सॅमसंगने त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी ए57 स्मार्टफोन 56,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. पहिल्यांदा दरवाढ झाल्यानंतर स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये झाली होती. आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनच्या किंमतीत हजारो रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये होती. मात्र आता हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 62,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच 12GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 72,499 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी डिव्हाईसची किंमत 67,499 रुपये होती.
सॅमसंगचा हा स्मार्टफोन 41,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. पहिल्यांदा दरवाढ झाल्यानंतर या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 43,999 रुपये झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 43,999 रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट, खरेदी करण्यासाठी 46,999 रुपये मोजावे लागणार आहेत. 8GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 50,499 रुपयांऐवजी आता 54,499 रुपये मोजावे लागणार आहेत. 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 57,999 रुपये रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट, खरेदी करण्यासाठी 63,999 रुपये मोजावे लागणार आहेत.