Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर

Samsung Tri Fold Smartphone: जगातील पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन Huawei Mate XT Ultimate Design ला आता Samsung टक्कर देणार आहे. सॅमसंग लवकरच त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2025 | 12:17 PM
Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर

Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी सॅमसंग मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आता लवकरच त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेली चाचणी आणि पेटेंटनंतर आता कंपनी लवकरच त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. हा कंपनीचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन गॅलेक्सी जी फोल्ड या नावाने लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनची लाँच डेट काय असणार, स्मार्टफोनचं डिझाईन कसं असणार आणि त्याचे फीचर्स काय असतील याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

खुशखबर! iPhone 16 Plus खरेदी करण्याची सुवर्णसंधी, इथे मिळतंय तब्बल 11 हजार रुपयांच डिस्काऊंट

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, आगामी हाय-एंड डिव्हाईस 25W चार्जिंग सपोर्टसह लाँच केले जाऊ शकते. मात्र अ‍ॅडव्हान्स डिव्हाईसमध्ये एवढी स्लो चार्जिंग सपोर्ट दिल्यास कंपनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे पडू शकते. सॅमसंग मिड-रेंज फोनमध्ये आधीच इतरांपेक्षा मागे आहे, आता जर कंपनीने 25W चार्जिंग सपोर्ट ट्राय फोल्ड फोनमध्ये दिला तर ती आणखी मागे पडू शकते. याशिवाय आगामी डिव्हाईसमध्ये 10-इंचाचा डिस्प्ले आणि एक ट्रिपल-फोल्ड मॅकेनिज्म दिला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy G Fold मध्ये काय असणार खास?

डिजिटल चॅट स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंगचा हा फोन पूर्णपणे ओपन केल्यानंतर 9.96 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो Huawei च्या Mate XT च्या 10.2 इंच स्क्रीनपेक्षा थोडा छोटा असू शकतो. यात ड्युअल इनर-फोल्डिंग डिझाइन असू शकते, जे दोन्ही बाजूंनी आतील बाजूस फोल्ड होईल, जे बंद केल्यावर प्रायमरी डिस्प्लेला अतिरिक्त संरक्षण प्रदान करेल.

S पेन सपोर्ट मिळण्याची शक्यता

फोनचा फॉर्म फॅक्टर S पेन सपोर्टचे संकेत देखील देत आहे. कारण काही पेटेंट फाइलिंगमध्ये स्टाइलससाठी जागा देण्यात आली आहे. जो टॅबलेट आणि स्मार्टफोनमधील अंतर अजून कमी करणार आहे. यामुळे सॅमसंगचा नवीन G Fold प्रोडक्टिविटी, डिजिटल आर्ट आणि मीडिया कंजप्शनसाठी एक पावरफुल डिव्हाईस बनू शकतं.

कधी आणि कुठे होणार सर्वात पहिलं लाँच?

सॅमसंगचा पहिला ट्रायफोल्ड फोन ग्लोबल लेव्हलवर लाँच केला जाऊ शकतो. असा अहवाल देखील समोर आला आहे की, गॅलेक्सी जी फोल्ड सुरुवातीला चीन आणि दक्षिण कोरियासारख्या निवडक प्रदेशांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हाय प्रोडक्शन कॉस्ट असल्यामुळे कंपनी असं करण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, जर फीडबॅक चांगला असला तरी कंपनी 2026 मध्ये त्याची उपलब्धता वाढवण्याचा विचार करू शकते.

Huawei दुसरा ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत, टिप्स्टरने शेअर केले अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy G Fold ची काय असणार किंमत?

सॅमसंग गॅलेक्सी जी फोल्डची किंमत लाखोंच्या घरात असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, हे डिव्हाईस $3,000 आणि $3,500 दरम्यानच्या किंंमतीत लाँच केले जाऊ शकते. म्हणजेच या डिव्हाईसची किंमत 2.56 लाख रुपये ते 2.99 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. आगामी ट्राय फोल्ड फोन फोल्डेबल गॅलेक्सी S25 अल्ट्रा किंवा अ‍ॅपलच्या आयफोन 16 प्रो मॅक्स सारख्या प्रीमियम डिव्हाइसपेक्षा खूपच चांगला असू शकतो.

Web Title: Samsung is going to launch their first tri fold smartphone what will be the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
1

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
2

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
3

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका
4

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.