खुशखबर! iPhone 16 Plus खरेदी करण्याची सुवर्णसंधी, इथे मिळतंय तब्बल 11 हजार रुपयांच डिस्काऊंट
आपल्याकडे देखील आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण फोनच्या किंमतींमुळे अनेक लोकांचं आयफोन घेण्याचं स्वप्न पूर्ण होत नाहीत. तुम्ही देखील अशा लोकांपैकी आहात का ज्यांची आयफोन घेण्याची इच्छा आहे, पण प्रचंड किंमतीमुळे फोन खरेदी करत नाहीत. तर आता आयफोन खरेदी करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर तुम्ही डिस्काऊंट आणि ऑफर्ससह आयफोन खरेदी करू शकता.
अॅमेझॉनवर iPhone 16 Plus च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. आता हा आयफोन तब्बल 11 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सहसा आयफोन 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केला जातो. मात्र आता ग्राहकांना तब्बल 11 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह iPhone 16 Plus खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्हाला देखील नवीन आयफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. ही ऑफर अशा युजर्ससाठी बेस्ट आहे, ज्यांना त्यांचा जुना आयफोन अपग्रेड करायचा आहे. चला तर अॅमेझॉनच्या या ऑफरवर एक नजर टाकूया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple चा मोठ्या स्क्रिनवाला iPhone 16 Plus भारतात 89,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता ग्राहकांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर हे डिव्हाईस 82,900 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच कंपनी या स्मार्टफोनवर प्लॅट 7,000 रुपयांचं डिस्काउंट देत आहे. याशिवाय स्मार्टफोनवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.
फोनवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, AXIS बँक क्रेडिट कार्ड आणि KOTAK बँक क्रेडिट कार्डसह 4,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 11 हजार रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. यामुळे आपल्याकडे आयफोन असावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. शिवाय ज्यांना त्यांचा जुना आयफोन अपग्रेड करून नवीन डिव्हाईस खरेदी करायचे असेल त्यांच्यासाठी देखील ही ऑफर फायद्याची ठरणार आहे.
iPhone 16 Plus मध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅपलचे हे पावरफुल डिव्हाईस A18 चिपने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये सर्व अॅप्पल इंटेलिजेंस फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोन जबरदस्त आहे. यामध्ये 48MP चा प्रायमरी सेंसर आणि यासोबतच मागील बाजूस 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये 12MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या आयफोन मॉडेलमध्ये IP68 रेटिंग आहे आणि यामध्ये अॅल्युमीनियम फ्रेम देखील देण्यात आली आहे.