गॅलेक्सी स्मार्टफोन्स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ! सॅमसंगने जाहीर केल्या स्मार्टफोनच्या विशेष किंमती, ग्राहकांचा होणार फायदा
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या काही निवडक स्मार्टफोन्सवरील किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना गॅलेक्सी स्मार्टफोन्स अभूतपूर्व किमतींत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लाँचिंगवेळी या स्मार्टफोनच्या किंमती खूप कमी होत्या. मात्र आता ग्राहक हे स्मार्टफोन आकर्षक किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळे आता ग्राहक कमी किंमतीत एआय-समर्थित वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे दैनंदिन अनुभव अधिक सहजसाध्य, सर्जनशील आणि उत्पादनक्षम झाले आहेत.
GST tax Change: AC, फ्रीज आणि TV सह हे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स झाले स्वस्त, वाचा संपूर्ण यादी
काऊंटरपॉइण्ट रिसर्चच्या मते, गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा हा एक प्रिमियम स्मार्टफोन आहे, ज्याची सर्वाधिक विक्री होते. हा स्मार्टफोन १,२९,९९९ रुपयांत लाँच करण्यात आला होता. मात्र हा स्मार्टफोन फेस्टिव्ह सेलदरम्यान ७१,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध असेल. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ ची शक्ती असलेला गॅलेक्सी एस२४ फक्त ३९,९९९ रूपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तर गॅलेक्सी एस२४ सिरीजप्रमाणे प्रगत एआय अनुभवाचा समावेश असलेला गॅलेक्सी एस२४ एफई फक्त २९,९९९ रूपयांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गॅलेक्सी ए५५ ५जी २३,९९९ रूपये आणि गॅलेक्सी ए३५ ५जी फक्त १७,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. काऊंटरपॉइण्ट रिसर्चच्या मते, सॅमसंग गॅलेक्सी ए५५ ५जी आणि गॅलेक्सी ए३५ ५जी २०२४ मध्ये त्यांच्या किमती श्रेणीमधील पहिल्या क्रमांकाचे विक्री होणारे स्मार्टफोन होते. गॅलेक्सी ए५५ ५जी आणि ए३५ ५जी मध्ये आकर्षक ६.६ इंच एफएचडी+ १२० हर्ट्झ सुपर एएमओएलईडी डिस्प्ले, डॉल्बी स्टिरिओ स्पीकर्स आणि बाहेरील वातावरणामध्ये सुस्पष्ट, प्रखर व्हिज्युअल्ससाठी व्हिजन बूस्टर आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ५० मेगापिक्सल मेन कॅमेरासह ओआयएस, अल्ट्रा-वाइड व मॅक्रो लेन्सेस, तसेच सुधारित नाइटोग्राफी आहे.
iPhone 17 Vs iPhone 16: हे 5 मोठे बदल आणि लोकं बनले नव्या आयफोन सिरीजचे दीवाने! जाणून घ्या सविस्तर
गॅलेक्सी एम३६ ५जी, गॅलेक्सी एम१६ ५जी आणि गॅलेक्सी एम०६ ५जी हे स्मार्टफोन आता 30 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी केले जाऊ शकतात. गॅलेक्सी एम३६ ५जी फक्त १३,९९९ रुपये, गॅलेक्सी एम१६ ५जी १०,४९९ रुपये आणि गॅलेक्सी एम०६ ५जी फक्त ७४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा, गॅलेक्सी एस२४, गॅलेक्सी एस२४ एफई, गॅलेक्सी ए३५ ५जी, गॅलेक्सी एम३६ ५जी, गॅलेक्सी एम१६ ५जी आणि गॅलेक्सी एफ३६ ५जी यावरील ऑफर्स २२ सप्टेंबर २०२५ पासून होणार आहेत.
गॅलेक्सी एस२४ अल्ट्राची लाँच किंमत १२९९९९ रुपये आहे, मात्र आता हा फोन ७१९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. गॅलेक्सी एस२४ ची लाँच किंमत ७४९९९ रुपये आहे, पण आता हा स्मार्टफोन ३९९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी ए५५ ५जीची लाँच किंमत ३९९९९ रूपये आहे, मात्र आता हा स्मार्टफोन २३९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी ए३५ ५जीची लाँच किंमत ३०९९९ रूपये आहे, मात्र आता हा स्मार्टफोन १७९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी एम३६ ५जीची लाँच किंमत १९९९९ रूपये आहे, मात्र आता हा स्मार्टफोन १३९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी एम१६ ५जीची लाँच किंमत १३४९९ रूपये आहे, मात्र आता हा स्मार्टफोन १०४९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी एम०६ ५जीची लाँच किंमत ९९९९ रूपये आहे, मात्र आता हा स्मार्टफोन ७४९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी एफ३६ ५जीची लाँच किंमत १९९९९ रूपये आहे, मात्र आता हा स्मार्टफोन १३९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी एफ०६ ५जीची लाँच किंमत ९९९९ रूपये आहे, मात्र आता हा स्मार्टफोन ७४९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.