
सायबर गुन्हेगारांसाठी आमंत्रण की कंपन्यांचा निष्काळजीपणा? सॅटेलाइट लिंक असुरक्षित, सहज लीक होतोय सरकारी आणि वैयक्तिक डेटा
समोर आलेल्या अहवालानंतर तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, लीक झालेल्या डेटामध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट डेटा, SMS आणि वैयक्तिक कॉल्सचा समावेश आहे. हा सर्व डेटा कोणत्याही एन्क्रिप्शन शिवाय पाठवला जात होता. यामध्ये मॅक्सिकन आणि अमेरिकन सरकार यांच्यातील काही संभाषण देखील समाविष्ट होते. सिक्योरिटी एक्सपर्ट्स या समोर आलेल्या अहवालामुळे चिंतेत आहेत. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे लो-कॉस्ट इक्विपमेंट देखील अगदी सहजपणे सॅटेलाइट्सचे सीक्रेट जाणून घेऊ शकतील.
तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, संशोधकांनी दक्षिण कॅलिफोर्नियावरून दिसणाऱ्या भूस्थिर उपग्रहांकडे एका कंज्यूमर सॅटेलाइट डिशचे मार्गदर्शन केले आणि एकूण 39 उपग्रहांचे स्कॅनिंग केले. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात अनप्रोटेक्टेड स्ट्रीमिंग डेटा आढळला. यामधील सुमारे निम्म्याहून जास्त सिग्नल असे होते, ज्यामध्ये कंज्यूमर, कॉर्पोरेट किंवा गवर्नमेंट ट्रॅफिकचा समावेश होता. हे सिग्नल पूर्णपणे असुरक्षित होते, जे अगदी सहज ऐकले जाऊ शकत होते. इंटरसेप्टेड डेटामध्ये वैयक्तिक कॉल्स आणि टेक्स्ट मेसेज, इन-फ्लाइट Wi-Fi यूज आणि क्रिटिकल इंफ्रास्ट्रक्चर लिंक समाविष्ट होते. T-Mobile सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांसह शेकडो कंपन्या नकळतपणे त्यांचा डेटा या अनएन्क्रिप्टेड लिंकवर पाठवत होत्या.
एक्सपर्ट्सने चेतावनी दिली आहे की, हा धोका केवळ ऐकण्यापर्यंत मर्यादित नाही. सॅटेलाइट कम्युनिकेशन इंटरसेप्ट करून अटॅकर्स खोट्या कमांड्स नेटवर्क्समध्ये पाठवू शकतात किंवा टू-फॅक्टर कोड देखील कॅच करू शकतात. स्टेट-स्पॉन्सर्ड इंटरफेरेंसयांनी जारी केलेला अहवाल देखील याच त्रुटीसंबंधित आहे.
तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
UK स्पेस कमांडने दिलेल्या माहितीनुसार, रशिया अनेकदा पश्चिमी कम्युनिकेशन्स इंटरसेप्ट करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपले उपग्रह ठेवतो आणि 2022 मध्ये वियासॅट का-सॅट नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे संपूर्ण युरोपमधील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. आता एक्सपर्ट्स स्पेस-बेस्ड कम्युनिकेशनला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक स्थरावर मजबूत एन्क्रिप्शनचा सल्ला देत आहेत आणि काही कंपन्यांनी तर त्यांच्या सॅटेलाइट लिंक्स एन्क्रिप्ट करण्यास सुरुवात केली आहे.