Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

सरकारने आदेश जारी केले होते की, प्रत्येक स्मार्टफोनमध्ये संचार साथी अ‍ॅप असणं अनिवार्य आहे. पण सरकारने जारी केलेल्या या आदेशानंतर आता अनेक वाद सुरु झाले आहेत. विरोधकांनी या अ‍ॅपवर गंभीर टीका केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 03, 2025 | 11:03 AM
संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • संचार साथी अ‍ॅप प्री- इंस्टॉल करण्याचे निर्देश
  • विरोधकांनी अ‍ॅपवर केले गंभीर आरोप
  • संचार साथी अ‍ॅपचे सत्य नक्की आहे काय?
केंद्र सरकारने स्मार्टफोन कंपन्यांना आगामी सर्व स्मार्टफोनमध्ये संचार साथी अ‍ॅप प्री- इंस्टॉल करण्याचे निर्देश जारी केले आहेत. यासाठी कंपन्यांना 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याशिवाय सरकारने मोबाईल कंपन्यांना जुन्या स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेटद्वारे संचार साथी अ‍ॅप इंस्टाल करण्याचा देखील सल्ला दिला आहे. मात्र आता सरकारच्या या आदेशावर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधकांनी म्हटलं आहे की, सरकारने इंस्टाल करण्यास सांगितलेला हा अ‍ॅप हेरगिरी करत आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे आता अनेक स्मार्टफोन यूजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत.

Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

संचार साथी अ‍ॅप फोनमध्ये प्री-इंस्टॉल करायला सांगितल्यापासून वाद वाढला आहे. विरोधकांनी सांगितलं आहे की, सरकार या अ‍ॅपद्वारे यूजर्सची हेरगिरी करणार आहे. मात्र सरकारचं असं म्हणणं आहे की, हे कोणतेही हेरगिरी करणारा अ‍ॅप नाही, तर हे एक सायबर सिक्योरिटी टूल आहे. या अ‍ॅपबाबत केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे की, हे अ‍ॅप फोन्ससाठी अनिवार्य नाही. यूजर्स देखील हे अ‍ॅप डिलीट करू शकतात. हे अ‍ॅप यूजर्सची सायबर सुरक्षा वाढावी, यासाठी प्री – इंस्टॉल करण्याचे आदेश दिले होते.  (फोटो सौजन्य – Pinterest)

संचार साथी खरंच हेरगिरी करणारा अ‍ॅप आहे का?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, संचार साथी अ‍ॅप एक सायबर सिक्योरिटी टूल आहे. हे अ‍ॅप जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आले होते. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून यूजर्स हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात. या अ‍ॅपच्या मदतीने यूजर्स सायबर फ्रॉड, फोन चोरी आणि कॉल मेसेज किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर होणाऱ्या फ्रॉडला रिपोर्ट करू शकतात. या सर्वांसाठी संचार साथी अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर त्याला काही परवानगी द्यावा लागणार आहेत. याच परवानग्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधकांनी संचार साथी अ‍ॅपला हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हटलं आहे. हे अ‍ॅप यूजर्सकडून कोणत्या परवानग्या मागते, याबाबत जाणून घेऊया.

अँड्रॉईड अ‍ॅपमध्ये महत्त्वाच्या आहेत या परवानग्या

फोन कॉल करणं आणि त्यांना मॅनेज करणं: फोनमध्ये मोबाईल नंबरची ओळख पटवण्यासाठी ही परवागनी गरजेची आहे.

एसएमएस पाठवणं: अ‍ॅपमध्ये रजिस्ट्रेशनसाठी DoT ला एसएमएस पाठवणं.

कॉल/ एसएमएस पाठवणं: कॉल किंवा एसएमएसला संचार साथी अ‍ॅपमध्ये रिपोर्ट करण्यासाठी ही परवागनी गरजेची आहे.

फोटो आणि फाईल्स: कॉल किंवा एसएमएसची ईमेज अपडेट करण्यासाठी, चोरी झालेला मोबाईल आणि दुसऱ्या डॉक्यूमेंटसाठी ही परवागनी गरजेची आहे.

कॅमेरा: फोनमध्ये IMEI नंबर स्कॅन करण्यासाठी कॅमेरा एक्सेस देणं गरजेचं आहे.

IOS अ‍ॅपमध्ये या परवानग्या आहेत गरजेच्या

फोटो आणि फाईल्स: कोणत्याही फ्रॉडला रिपोर्ट करण्यासाठी कॉल किंवा एसएमएसच्या ईमेज एक्सेस गरेजचा आहे. तसेच चोरी झालेला आणि हरवलेला मोबाईलचा रिपोर्ट करण्यासाठी फोटो आणि फाईल्स एक्सेस गरजेचा आहे.

कॅमेरा: फोनमध्ये असलेला IMEI नंबर स्कॅन करण्यासाठी कॅमेरा एक्सेस गरजेचा आहे.

संचार साथी अ‍ॅपबाबत सरकारने सांगितलं आहे की, हे अ‍ॅप यूजर्सची वैयक्तिक माहिती ऑटोमॅटिक कॅप्चर करत नाही. यासोबतच सरकारने असं देखील सांगितलं आहे की, जर यूजरकडे कोणत्याही वैयक्तिक माहितीची मागणी केली जात असेल तर यूजरला सांगितलं जात की, ही माहिती का मागितली जात आहे. यासोबतच यूजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांची काळजी घेतली जाते.

Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या

संचार साथी अ‍ॅपच्या वेबसाईटमध्ये सांगितलं आहे की, यूजर्सची माहिती कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपसोबत शेअर केली जात नाही. याशिवाय, गरज असेल तेव्हा हा डेटा इन्फॉर्मेसमेंट एजंसीसोबत शेअर केला जाऊ शकतो. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमध्ये संचार साथी अ‍ॅपबाबत असा दावा केला जात आहे की, या अ‍ॅपचे डेव्हलपर यूजर्सचा कोणताही डेटा कलेक्ट करत नाहीत. अँड्रॉईड प्ले स्टोअरमध्ये असा दावा केला जात आहे की, हा अ‍ॅप डेटा कलेक्ट करत नाही. तसेच डेटा कोणत्याही थर्ट पार्टीसोबत शेअर देखील करत नाही.

अ‍ॅपद्वारे हेरगिरी करणं शक्य आहे का?

फोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर संचार साथी अ‍ॅप ज्या परवानग्या मागत आहे, त्या अतिशय सामान्य आहेत. यूपीआय किंवा दुसऱ्या बँकिंग अ‍ॅप काम करण्यासाठी अशाच प्रकारच्या परवानग्या मागतात. सोशल मीडिया अ‍ॅप्सचा विचार केला तर अशा अ‍ॅप्सना आपण अनेक परवानग्या देतो. पण संचार साथी अ‍ॅप माईक, लोकेशन किंवा सेंसर सारख्या कोणत्याही परवानग्या मागत नाही. अशा परिस्थिती या अ‍ॅपवर जासूसी करण्याचा आरोप लावणं अत्यंत चुकीचं आहे. हा अ‍ॅप यूजर्सकडू केवळ फोन आणि एसएमएस, कॅमेरा आणि दुसऱ्या परवानगीचा एक्सेस मागतो, ज्या गरजेच्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संचार साथी अ‍ॅप म्हणजे काय?

    Ans: Sanchar Saathi हा DoT (Department of Telecommunications) चा अधिकृत अ‍ॅप आहे, जो मोबाइल फोन चोरी, फसवणूक, सिम गैरवापर आणि KYC फ्रॉड रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

  • Que: हा अ‍ॅप मोफत आहे का?

    Ans: होय! संचार साथी पूर्णपणे मोफत वापरता येतो.

  • Que: TAFCOP सेवा म्हणजे काय?

    Ans: TAFCOP (Telecom Analytics for Fraud Management) द्वारे तुमच्या आधार/ID वर किती सिम कार्ड्स जारी आहेत ते पाहता येते. अनोळखी SIM असल्यास रिपोर्ट करू शकता.

Web Title: Serious allegations on sanchar saathi app opponents said app sanchar saathi is spy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

2 अब्ज डॉर्लसच्या ‘व्हाइट स्पेस’वर नजर! ICH NEXT- Peclers Paris कडून भारत-प्रथम ग्लोबल लोकल ट्रेंड इंटेलिजन्स सर्व्हिसची घोषणा
1

2 अब्ज डॉर्लसच्या ‘व्हाइट स्पेस’वर नजर! ICH NEXT- Peclers Paris कडून भारत-प्रथम ग्लोबल लोकल ट्रेंड इंटेलिजन्स सर्व्हिसची घोषणा

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
2

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का
3

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
4

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.