Samsung Galaxy Tab A11+: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच, 11-इंच डिस्प्ले आणि 7,040mAh बॅटरीने सुसज्ज... जाणून घ्या किंमत
गॅलेक्सी टॅब ए११+ स्ट्रिमिंग व डिजिटल शिक्षणासाठी सुलभ स्क्रॉलिंग आणि सर्वोत्तम व्युइंग अनुभव देतो. आकर्षक डिस्प्लेला पूरक क्वॉड स्पीकरसह डॉल्बी अॅटमॉस आहे, जे चित्रपट, संगीत व ऑनलाइन शिक्षणासाठी विशाल, संतुलित ऑडिओ देते. या डिवाईसमध्ये दृश्यमानता वाढवण्यासाठी ३.३ मिमी ऑडिओ जॅक आहे. ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा व्हिडिओ कॉल्सदरम्यान सुस्पष्ट आवाज ऐकू येण्याची, तसेच डॉक्यूमेंट स्कॅनिंग आणि कन्टेन्ट कॅप्चर करण्याची सुविधा देतात. यामुळे विद्यार्थी, क्रिएटर्स आणि कुटुंबांना सहजपणे कनेक्टेड व उत्पादनक्षम राहता येते.
”सॅमसंगमध्ये आम्ही दैनंदिन जीवन उत्साहित करणारे अर्थपूर्ण नाविन्यता अधिक उपलब्ध करून देण्याप्रती कटिबद्ध आहोत. गॅलेक्सी टॅब ए११+सह आम्ही भारतातील अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी शक्तिशाली एआय क्षमता, प्रीमियम डिझाइन आणि दिवसभर कार्यरत राहणारी विश्वसनीय कार्यक्षमता सादर करत आहोत. हा डिवाईस चालता-फिरता उत्पादकता, शिक्षण व मनोरंजनाचा आनंद देण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे संचालक सग्निक सेन म्हणाले. (फोटो सौजन्य – X)
गॅलेक्सी टॅब ए११+मध्ये आवश्यक एआय वैशिष्ट्ये आहेत, जी वापरकर्त्यांना सहजपणे शिकण्यास, शोध घेण्यास आणि टास्क्स पूर्ण करण्यास मदत करतात. गुगल जेमिनीसह वापरकर्त्यांना रिअल-टाइम व्हिज्युअल एआय मिळते, ज्यासह ते परस्परसंवादामध्ये अधिक सामावून जाऊ शकतात, ज्यामुळे दैनंदिन टास्क्स अधिक सोपे होतात. सर्कल टू सर्च विथ गुगल साध्या गेस्चरसह त्वरित प्रतिसाद देते, ज्यामुळे वापरकर्त्यांना स्क्रिनवर शोध घेण्यास, माहिती समजून घेण्यास आणि कोणत्याही गोष्टीमध्ये सखोलपणे सामावून जाण्यास मदत होते. वापरकर्ते बातम्यांचे लेख, सोशल मीडिया पोस्ट्स किंवा ऑनलाइन कन्टेन्ट स्क्रॉल करत असताना रिअल टाइममध्ये मजकूर देखील भाषांतरित करू शकतात, जेथे स्क्रिनवर त्वरित त्यांच्या पसंतीच्या भाषेमध्ये भाषांतर उपलब्ध होते.
सॉल्व्ह मॅथ ऑन सॅमसंग नोट्स गणितामधील समीकरणांसाठी व गृहपाठांसाठी पायरीनुसार साह्य करते. ते गणितामधील गुंतागूंतीच्या समीकरणांसाठी त्वरित व अचूक सोल्यूशन देते, जेथे टूल रिअल टाइममध्ये हस्तलिखित व टाइप केल्या जाणाऱ्या समीकरणांसाठी सोल्यूशन देते. यासह मुलभूत गणितापासून प्रगत, वैज्ञानिक कॅल्क्युलेटर-लेव्हल गणन आणि मापनासाठी एकक रूपांतरणापर्यंत उत्तम सोल्यूशन्सची खात्री मिळते. शाळेमधील शिक्षण, काम किंवा घरामध्ये मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असो ही वैशिष्ट्ये शिक्षणाला अधिक परस्परसंवादी आणि उत्पादकतेला अधिक विनासायास करतात.
४एनएम आधारित मीडियाटैक एमटी८७७५ प्रोसेसरची शक्ती असलेला गॅलेक्सी टॅब ए११+ मल्टीटास्किंगसाठी सुलभ कार्यक्षमता देतो. ६ जीबी + १२८ जीबी आणि ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असलेल्या या डिवाईसमध्ये जवळपास २ टीबीपर्यंत विस्तारित करता येणारी स्टोरेज क्षमता आहे. ज्यामुळे हा डिवाईस कन्टेन्ट, मोठ्या फाइल्स आणि लर्निंग मटेरिअल स्टोअर करण्यासाठी अनुकूल आहे. ७,०४० एमएएच बॅटरीसह २५ वॅट फास्ट चार्जिंग विश्वासार्ह, दिवसभर वापराची खात्री देते.
गॅलेक्सी टॅब ए११+ ग्रे व सिल्व्हर रंगामधील सुधारित फिनिशिंग पर्यायांसह आकर्षक मेटल डिझाइनमध्ये येतो. हा डिवाईस स्लिम असून लांबी २५७.१ मिमी, रूंदी १६८.७ मिमी व उंची ६.९ मिमी आहे, तसेच वजन ४८० ग्रॅम (वायफाय) व ४९१ ग्रॅम (५जी) आहे. हा डिवाईस दिवसभर आरामदायी पोर्टेबिलिटी देतो. ५जी व वाय-फाय व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असलेला गॅलेक्सी टॅब ए११+ घरी मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असो, काम करायचे असो किंवा चालता-फिरता सहजपणे कनेक्टेड राहण्याची सुविधा देतो.
गॅलेक्सी टॅब ए११+ २८ नोव्हेंबरपासून १९,९९९ रूपयांपासून उपलब्ध असेल (बँक कॅशबॅकसह). हा डिवाईस अॅमेझॉन, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल.






