दमदार फीचर्ससह Moto Watch भारतात लाँच! अॅडवांस्ड स्लीप ट्रॅकर आणि OLED डिस्प्लेने सुसज्ज, इतकी आहे किंमत
अॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर
भारतात Moto Watch ची किंमत सिलिकॉन स्ट्रॅप व्हेरिअंटसाठी 5,999 रुपयांपासून सुरु होते. तर मेटल आणि लेदर स्ट्रॅप व्हेरिअंट 6,999 रुपयांच्या किंमतीत ऑफर केले जाणार आहे. मोटोरोला इंडिया वेबसाइटद्वारे हे स्मार्टवॉच 30 जानेवारीपासून देशात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मोटो वॉचचे सिलिकॉन स्ट्रॅप मॉडेल पँटोन हर्बल गार्डन, पँटोन वोल्केनिक ऐश आणि पँटोन पॅराशूट पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर लेदर स्ट्रॅप व्हेरिअंट पँटोन मोका मूस शेडमध्ये उपलब्ध आहे. याप्रमाणेच स्टेनलेस स्टील बँड मॉडल मॅट ब्लॅक आणि मॅट सिल्वर कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
moto Watch has been launched in India.
Premium design meets smart fitness—starting at just ₹5,999 💥
✨ Aluminium body + Corning® Gorilla® Glass 3
💧 IP68 water protection | 1 ATM pressure rating
❤️ Advanced wellness tracking (Powered by Polar)
🗺️ Dual-frequency GPS for accurate… pic.twitter.com/52NWAvKTj6 — Prathap G (@prathapgtech) January 23, 2026
Moto Watch या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये एक गोल डायल आहे, ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह 1.4-इंच OLED डिस्प्ले आहे. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या या स्मार्टवॉचमध्ये 4GB eMMC स्टोरेज आहे. हे डुअल-फ्रीक्वेंसी GPS आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटीला देखील सपोर्ट करते. हेल्थ आमि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर या नव्या स्मार्टवॉचमध्ये, मोटो वॉच हार्ट रेट मॉनिटरिंग, रिकवरी मॉनिटरिंग, हाइड्रेशन रिमाइंडर, ब्लड-ऑक्सीजन लेवल मॉनिटरिंग, स्टेप काउंटर आणि कॅलरी काउंटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच यूजर्सना झोपेच्या गुणवत्तेच्या आधारे स्लीप स्कोअर देखील देईल.
मोटो वॉच Android 12 किंवा नवीन वर्जनवर चालणाऱ्या डिव्हाईससोबत कम्पॅटिबल आहे. यामध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक जायरोस्कोप, एक PPG सेंसर, SpO2 सेंसर, एक एम्बिएंट लाइट सेंसर आणि एक ई-कम्पास आहे. मोटोरोलाने दावा केला आहे की, त्यांचे नवीन मोटो वॉच 13 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देईल आणि पाच मिनिटे चार्जिंग केल्याने ते ‘एक दिवस’ चालेल. यामध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 रेटिंग आहे.






