सध्याच्या काळात आपला स्मार्टफोन आपली गरज बनून राहीला आहे, स्मार्टफोनशिवाय आता एकही काम करणे फार कठीण बसते. आपण आपल्या फोनचा वापर करून आपले अनेक कामे सहज आणि कमी वेळेत पूर्ण करू शकतो. तसेच आपले महत्तवाचे कागदपत्रे, फोटो आणि व्हिडिओ स्टोर करण्यासाठीही या स्मार्टफोनचा वापर आपण करत असतो. मात्र लाँच केलेल्या बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये 128GB स्टोरेज उपलब्ध असतो.
सध्या युजर्स सोशल मीडियावर इतकी सक्रिय आहेत की त्यांचा फोन स्टोरेजदेखील पुन्हा पुन्हा भरला जातो. फोनची मेमरी मोकळी करण्यासाठी, युजर्सना त्यांचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ गॅलरीमधून हटवावे लागतात. याशिवाय फोनमध्ये असलेल्या ॲप्सनीही जास्त स्टोरेज घ्यायला सुरुवात केली आहे. गुगलने नुकतेच यासाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे तुमच्या फोनची मेमरी मोकळी करण्यात मदत करते. हे फिचर नक्की कोणते आहे आणि याचा वापर कसा करावा याची माहिती आज आम्ही या लेखातून देत आहोत.
हेदेखील वाचा – 300 रुपयांहून कमी पैशात येतात Jio चे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळतात अनेक फिचर्स
या सेटिंगला तुमच्या फोनमध्ये ऑन केल्यानंतर तुमच्या फोनमधील ते सर्व ॲप्स Archive मध्ये पोहचतील, ज्यांचा वापर तुम्ही सर्वात कमी करता. अशाप्रकारे तुमच्या फोनचे स्टोरेज लवकर भरणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला फोनमधील कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ डिलीट करण्याची गरज भासणार नाही.