
Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे
जर आपण स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप्सचा वापर करत असू तर फोनच्या रॅम आणि बॅकग्राऊंड प्रोसेसरवर भर येऊ शकतो. अॅप्स बंद झाल्यानंतर देखील बॅकग्राऊंडमध्ये सुरु राहतात. ज्यामुळे स्मार्टफोनची स्पीड होऊ लागते. रीस्टार्ट केल्याने या अनावश्यक प्रक्रिया बंद होतात आणि सिस्टिम नव्याने सुरू होते. स्मार्टफोन रिस्टार्ट केल्याने कोणते फायदे होतात, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुमचा स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल किंवा अॅप सुरु होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर स्मार्टफोन रोज रिस्टार्ट करू शकतो. यामुळे स्मार्टफोनच्या परफॉर्मंसवर बराच फरक पडतो. स्मार्टफोन रिस्टार्ट केल्यानंतर रॅम रिकामी होतो आणि प्रोसेसरवरील दबाव कमी होतो. यामुळे स्मार्टफोन पूर्वीपेक्षा अधिक स्मूद चालतो. विशेषत: जर तुम्ही गेमिंग आणि मोठ्या अॅप्सचा वापर करत असाल तर स्मार्टफोन रिस्टार्ट करण्याची सवय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
काही अॅप्स गरज नसताना बॅटरीचा वापर करतात. यूजर्सना समजत देखील नाही आणि अॅप्समुळे फोनची बॅटरी वेगाने कमी होऊ लागते. स्मार्टफोन रिस्टार्ट केल्याने असे अॅप्स आणि बॅकग्राऊंड अॅक्टिव्हिटीज बंद होतात. ज्यामुळे बॅटरी बॅकअप अधिक चांगला होऊ शकतो. तसेच जर तुम्ही स्मार्टफोनचा जास्त वापर करत नसाल मात्र तरी देखील बॅटरी वारंवार संपत असेल तर अशावेळी तुम्ही स्मार्टफोन रिस्टार्ट करू शकता.
उन्हाळ्यात दिर्घकाळ स्मार्टफोनवर व्हिडीओ पाहिल्याने किंवा गेम खेळल्याने ओव्हरहिटींगची समस्या निर्माण होते. स्मार्टफोन जर सतत गरम होत असेल तर हार्डवेअरला नुकसान पोहोचू शकतं. अशावेळी स्मार्टफोन रिस्टार्ट केला तर प्रोसेसरवरील भार कमी होतो आणि स्मार्टफोन ओव्हरहिटींगची समस्या देखील दूर होण्यासाठी मदत होते.
अनेकदा छोटे बग्स किंवा सॉफ्टवेअर ग्लिच येतात. अशावेळी काय करावं, यूजर्सना सूचत नाही. पण तुम्ही स्मार्टफोन रिस्टार्ट केल्यास छोटे बग्स किंवा सॉफ्टवेअर ग्लिच दूर होण्यासाठी मदत होऊ शकते. याशिवाय, सिक्योरिटी अपडेट्स आणि सिस्टिममधील बदल योग्य पद्धतीने लागू होण्यासाठी स्मार्टफोन रिस्टार्ट करणं गरजेचं आहे.
बीट्स ऑन अन् जग ऑफ! दमदार बॅटरी लाईफसह नव्या Oppo ईयरबड्सची भारतात एंट्री… असे आहेत फीचर्स
रोज वांरवार स्मार्टफोन रिस्टार्ट करण्याची आवश्यकता नाही. मात्र दिवसातून एकदा किंव आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा स्मार्टफोन रिस्टार्ट केल्यास फायदा होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी स्मार्टफोन करणं अतिशय चांगली सवय मानली जाते.