
Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या
स्मार्टवॉच खरेदी करावं की स्मार्टबँड यामध्ये लोकं नेहमीच गोंधळेले असतात. कारण या दोन्हा डिव्हाईसची रचना काही प्रमाणात सारखी आहे. त्यामुळे आपल्यासाठी नेमकं कोणतं डिव्हाईस योग्य ठरू शकतं, हे अनेकांना समजत नाही. तुम्ही जर स्मार्टवॉच किंवा स्मार्टबँड यामध्ये गोंधळले आहात आणि कोणतं डिव्हाईस तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे, हे तुम्हाला देखील समजत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता आम्ही तुम्हाला या दोन्ही डिव्हाईसमधील फरक सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्यासाठी कोणतं डिव्हाईस योग्य ठरू शकतं, हे तुम्हाला समजेल. या दोघांमधील फरकासोबतच, तुमच्या गरजेनुसार स्मार्ट वॉच आणि स्मार्ट बँड यापैकी कोणता निवडावा हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्मार्टवॉच आणि स्मार्ट बँड हे दोन्ही गॅझेट एकसारखे दिसतात. मात्र त्यांच्या फीचर्समध्ये बराच फरक असतो. यातील एक गॅझेट रोजच्या वापरासाठी योग्य ठरतं जे त्यांच्या युजर्सना स्मार्टफोनसारखे काही फीचर्स ऑफर करते. तर दुसरं गॅझेट जीम आणि फीटनेसवर लक्ष देणाऱ्या युजर्ससाठी योग्य निवड ठरते. त्यामुळे दोन्हीपैकी कोणतंही गॅझेट खरेदी करण्यापूर्वी त्याचा वापर तुम्हाला कोणत्या कामासाठी करायचा आहे, हे लक्षात ठेवा. दोन्ही डिव्हाईसची रचना काही प्रमाणात सारखी असली तरी देखील त्यांच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टवॉच गोल आणि आयताकृती अशा दोन आकारांत उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचमध्ये मोठी स्क्रीन दिली जाते, जी स्मार्टफोनच्या एक्सटेंशनप्रमाणे काम करते. स्मार्टवॉचमध्ये टेक्स्ट, ईमेल आणि सोशल मीडिया नोटिफिकेशन तपासले जाऊ शकते. मात्र जर स्मार्ट बँडचा विचार केला तर हे गॅझेट फिटनेस-फोक्स्ड असतात. यामध्ये असे काही सेंसर दिलेले असतात जे स्मार्टफोनला डेटा फीड करतात. दोन्ही गॅझेटमधील स्क्रीन साइज, बिल्ड मॅटेरियल, सॉफ्टवेयर एक्सपीरियंस आणि काही सेंसरमध्ये फरक आहे.
स्मार्टवॉचचे डिझाइन ट्रेडिशनल वॉचसारखे असते. तुम्ही ऑफिस, पार्टी, घर आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे स्मार्टवॉच घालू शकता. अनेक स्मार्टवॉच डिटॅच होणाऱ्या स्ट्रैपसह येतात आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रैप्सचा वापर केला जातो. तर स्मार्टबँड रबर स्ट्रैपसह उपलब्ध असतात, हे स्पोर्ट्स किंवा फिटनेस अॅक्टिविटी दरम्यान घालणे योग्य ठरतं.
दोन्ही वीयरेबल डिव्हाईसचा वापर वेगळा आहे. जर तुम्ही स्पोर्ट्स किंवा फिटनेस अॅक्टिविटीसाठी जास्त वेळ देत असाल तर तुमच्यासाठी स्मार्टबँड एक योग्य निवड ठरू शकते. हे फिटनेस ट्रँकिंगद्वारे संपूर्ण दिवस तुम्हाला मोटिवेटेड ठेवेल आणि जास्त फिजिकल अॅक्टिविटी करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. दुसरीकडे, जर तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वापरण्यासाठी डिव्हाइस शोधत असाल, तर स्मार्टवॉच हा एक चांगला पर्याय आहे. ते फिटनेस ट्रॅकिंगसह चांगले डिझाइन आणि वैशिष्ट्ये देते.