इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या
Wi-Fi 8 ही पुढील पिढीची वायरलेस कनेक्टिविटी टेक्नोलॉजी आहे, ज्याला IEEE802.11 (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स इन्स्टिट्यूट) च्या Ultra High Reliability (UHR) प्रोजेक्टअंतर्गत विकसित केले जात आहे. आधीच्या Wi-Fi वर्जनमध्ये स्पीडवर जास्त फोकस केलं जात होतं. मात्र आता Wi-Fi 8 चा उद्देश अधिक चांगली स्थिरता, विश्वसनीय कनेक्शन आणि गती आहे. Qualcomm ने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन स्टँडर्ड अशा क्षेत्रांसाठी डिझाईन करण्यात आले आहे, जिथे कनेक्शन स्टेबिलीटीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. यामध्ये AI सिस्टम्स, रोबोटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि हाई-डेटा प्रोसेसिंग एप्लिकेशन सारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या Wi-Fi 8 विकास आणि चाचणीच्या टप्पात आहे. ही टेक्नोलॉजी IEEE च्या 802.11bn टास्क ग्रुप अंतर्गत स्टँडर्डाइज केली जात आहे. ज्यामध्ये Qualcomm आणि TP-Link सारख्या कंपन्या काम करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, IEEE 802.11 वर्किंग ग्रुप द्वारे Wi-Fi 8 ला अंतिम मंजूर मार्च 2028 पर्यंत दिली जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 2028 नंतर बाजारात Wi-Fi 8 आधारित राउटर आणि डिवाइस पाहायला मिळणार आहेत. TP-Link ची ही सुरुवात टेस्टिंग एक “प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट” च्या स्वरुपात करण्यात आली आहे. जेणेकरून येत्या काळात इतर कंपन्याही या दिशेने त्यांची उत्पादने तयार करू शकतील. Wi-Fi 8 ची आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचणी सुरू झाली असली तरी, भारतात त्याचा प्रवेश विलंबित होऊ शकतो.






