
बजेट स्मार्टफोन्साठी लाँच झाला Snapdragon 6s Gen 4 चिपसेट! 200MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6E चा मिळणार सपोर्ट
स्मार्टफोनसाठी प्रोसेसर तयार करणारी कंपनी Qualcomm ने बजेट रेंज डिव्हाईससाठी लेटेस्ट मोबाइल चिपसेट Snapdragon 6s Gen 4 लाँच केले आहे. हे चिपसेट कंपनीच्या गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या चिपसेट Snapdragon 6s Gen 3 वर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. Qualcomm ने दावा केला आहे की, हे चिपसेट CPU च्या बाबतीत 36 टक्के आणि GPU च्या बाबतीत 59 टक्के अधिक चांगला परफॉर्मंस ऑफर करतो.
Qualcomm चा हा चिपसेट लो-एंड अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी डिझाईन करण्यात आला आहे. हा चिपसेट 144Hz Full HD+ डिस्प्ले, 200 मेगापिक्सेलपर्यंत कॅमेरा सेंसर आणि Wi-Fi 6E सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. Snapdragon 6s Gen 4 चिपसेटचा मॉडेल नंबर SM6435-AA देण्यात आला आहे. 4nm नोड आणि 64-बिट आर्किटेक्चरवर बनवण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Kryo CPU समाविष्ट आहे, ज्याच्या 4 परफॉरमेंस कोरची क्लॉक स्पीड 2.4GHz पर्यंत आणि 4 एफिशिएंसी कोर 1.8GHz पर्यंत आहे. Qualcomm चं असं म्हणणं आहे की, गेल्या जनरेशनच्या तुलनेत यामध्ये 36 टक्के सुधारणा करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ग्राफिक्ससाठी या चिपसेटमध्ये Qualcomm Adreno GPU देण्यात आला आहे, जो OpenGL ES 3.2, Vulkan 1.1 आणि OpenCL 2.0 FP API सपोर्ट करतो. हा चिपसेट HDR गेमिंग आणि 10-बिट कलर डेप्थला सपोर्ट करतो. हे चिपसेट हार्डवेयर-एक्सेलेरेटेड H.265 आणि VP9 डिकोडिंगची सुविधा ऑफर करते. Qualcomm ने दिलेल्या माहितीनुसार, मागील पिढीपेक्षा GPU कामगिरी 59 टक्के चांगली आहे.
Snapdragon 6s Gen 4 चिपसेट LPDDR5 रॅमला 3200MHz पर्यंत सपोर्ट करतो. यासोबतच स्टोरेजसाठी यामध्ये UFS 3.1 चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा Full HD+ डिस्प्लेवर 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कॅमेरा सपोर्टबद्दल बोलायचं झालं तर हा 200 मेगापिक्सेलपर्यंत सिंगल आणि डुअल सेंसरसाठी 16 मेगापिक्सेलपर्यंत ऑप्शन सपोर्ट करतो.
कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर, 5G एमएमवेव्ह, वाय-फाय 6E आणि ब्लूटूथ 5.4 सह स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 चिपसेटला सपोर्ट करतो. यासोबतच यामध्ये Quick Charge 4+ द्वारे USB Type-C फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या चिपसेटमध्ये बायोमेट्रिक सिक्योरिटीसाठी क्वालकॉम 3डी सोनिक सेन्सर आणि 3डी सोनिक सेन्सर मॅक्स फिंगरप्रिंट रिकग्निशन देण्यात आले आहे. यासोबतच नेविगेशनसाठी यामध्ये QZSS, Galileo, Beidou, GLONASS, NavIC आणि GPS सारख्या सॅटेलाइट सिस्टम्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. Qualcomm ने दावा केला आहे की, त्याचे लेटेस्ट Snapdragon 6s Gen 4 चिपसेट लो-एंड स्मार्टफोन्समध्ये अधिक चांगला गेमिंग एक्सपीरियंस, हाई-रेजोल्यूशन कॅमेरा सपोर्ट आणि फास्ट कनेक्टिविटी ऑफर करतो.