Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

स्पेसएक्सच्या Falcon-9 रॉकेटचा वापर झाल्यानंतर अवकाशात भटकत असलेला वरचा टप्पा आता चंद्रावर आदळण्याच्या मार्गावर आहे. 5 ऑगस्ट रोजी होणारी ही धडक वैज्ञानिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2026 | 10:16 AM
स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

Follow Us
Follow Us:
  • स्पेसएक्सच्या Falcon-९ रॉकेटचा वरचा टप्पा ५ ऑगस्ट रोजी चंद्रावर आदळण्याचा अंदाज असून त्यामुळे सुमारे २७ मीटर रुंद खड्डा तयार होऊ शकतो.
  • NASA चे लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर आणि दक्षिण कोरियाचे डानुरी ऑर्बिटर धडकेपूर्वी व धडकेनंतरची छायाचित्रे टिपून या घटनेचा अभ्यास करणार आहेत.
  • या धडकेमुळे उडणारी धूळ आणि मलबा भविष्यातील मानवी चांद्र मोहिमांवरील संभाव्य धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटचा वापर झाल्यानंतर अवकाशात भटकत असलेला वरचा टप्पा आता चंद्रावर आदळण्याच्या मार्गावर असून ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पश्चिमेकडील आइन्स्टाईन क्रेटर परिसरात त्याची धडक होण्याचा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. या धडकेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठा खड्डा निर्माण होईल तसेच धूळ आणि खडकांचे ढग अंतराळात उडतील.

Friendship Day 2026: फ्रेंडशिप डे होईल आणखी खास! Gemini AI च्या मदतीने बनवा मित्रांसोबतचे अनोखे फोटो, वापरा हे प्रॉम्प्ट्स

अंतराळातील वस्तूंचा मागोवा घेणारे तज्ज्ञ बिल ग्रे यांच्या अंदाजानुसार, हे रॉकेट सुमारे ८,७०० किलोमीटर प्रतितास वेगाने चंद्रावर आदळेल. हा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास सातपट अधिक आहे. ही धडक चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागात होणार असली, तरी तिचा प्रकाशझोत अत्यंत क्षीण असल्याने पृथ्वीवरून तो उघड्या डोळ्यांनी पाहणे कठीण असेल. मात्र, दुर्बिणीच्या साहाय्याने धडकेनंतरचा धूळ-मलब्याचा ढग काही मिनिटे दिसू शकतो.

२७ मीटर रुंद खड्डा पडण्याची शक्यता

या धडकेमुळे चंद्रावर सुमारे २७ मीटर (९० फूट) रुंद आणि ५ मीटर (१६ फूट) खोल खड्डा तयार होण्याची शक्यता आहे. हा खड्डा पृथ्वीवरून दिसणार नसला, तरी चंद्राच्या कक्षेत फिरणारी याने त्याची छायाचित्रे टिपतील. नासाचे लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर आणि दक्षिण कोरियाचे डानुरी लूनर ऑर्बिटर धडकेपूर्वी आणि धडकेनंतरचे फोटो घेणार आहेत. डानुरी हे यान धडकेच्या अवघ्या दोन मिनिटे आधी रॉकेटच्या संभाव्य चडकेच्या ठिकाणाजवळून जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीही घडल्या होत्या अशा घटना

मानवनिर्मित वस्तूंची चंद्रावरील धडक ही पहिली घटना नाही. २०२२ मध्ये एका चिनी रॉकेटचा अवशेष चंद्राच्या दूरच्या बाजूला कोसळला होता. त्याआधी नासाने अपोलो मौहिमांदरम्यान आणि २००९ च्या लूनर क्रेटर ऑब्जर्वेशन एंड सेसिग सॅटेलाइट मोहिमेतही संशोधनासाठी जाणीवपूर्वक रॉकेटचे भाग चंद्रावर आदळवले होते.’

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्यानंतर Meta चा मोठा निर्णय! VIP अकाउंट्ससाठी जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर

धूळ अनेक किलोमीटरपर्यंत पसरणार

लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीचे वैज्ञानिक बेंजामिन फर्नांडो यांच्या मते, चंद्रावरील कमी गुरुत्वाकर्षण आणि वातावरणाचा अभाव यामुळे धडक झाल्यानंतर उडणारी धूळ व मलबा अनेक किलोमीटरपर्यंत पसरेल, भविष्यात चंद्रावर होणाऱ्या मानवी मोहिमांसाठी अंतराळातील अशा मलब्यामुळे किती धोका निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करण्यासाठी ही घटना महत्त्वाची ठरणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Spacex falcon 9 rocket to crash on moon on august 5 lunar impact nasa study

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
1

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
2

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच
3

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
4

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.