Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT वापरताय? तुम्हालाही लागू शकतो लाखोंचा चुना… सर्च रिझल्टमध्ये दिसल्या बनावट शॉपिंग लिंक्स; असं राहा सुरक्षित

ChatGPT Shopping Advice: चॅटजीपीटीवरून शॉपिंगचा सल्ला घेताय? चॅटजीपीटीने सर्ट रिझल्टमध्ये दाखवलेल्या लिंकवर क्लिक करताय? थांबा... तुमच्यासोबत देखील होऊ शकतो मोठा स्कॅम. तुमचंही होऊ शकतं लाखो रुपयांचं नुकसान. कसं? जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2026 | 09:22 AM
ChatGPT वापरताय? तुम्हालाही लागू शकतो लाखोंचा चुना... सर्च रिझल्टमध्ये दिसल्या बनावट शॉपिंग लिंक्स; असं राहा सुरक्षित

ChatGPT वापरताय? तुम्हालाही लागू शकतो लाखोंचा चुना... सर्च रिझल्टमध्ये दिसल्या बनावट शॉपिंग लिंक्स; असं राहा सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटनमध्ये ChatGPT च्या सर्च रिझल्टमध्ये बनावट शॉपिंग वेबसाइट्स दिसल्याने अनेक वापरकर्ते ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरले.
  • स्कॅमर्स प्रसिद्ध ब्रँड्ससारख्या दिसणाऱ्या खोट्या वेबसाइट्स तयार करून ग्राहकांची बँकिंग आणि पेमेंट माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.
  • तज्ज्ञांनी शॉपिंगपूर्वी वेबसाइटचा URL तपासण्याचा आणि AI ने दिलेल्या लिंकऐवजी अधिकृत वेबसाइटला थेट भेट देण्याचा सल्ला दिला आहे.
एआय चॅटबोट आता विविध क्षेत्रातील अनेक कामांसाठी वापरला जातो. जॉबसंबंधित सल्ल्यांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासापर्यंत सर्व कामांसाठी चॅटजीपीटीचा वापर केला जातो. याशिवाय चॅटजीपीटी शॉपिंगमध्ये देखील आपल्याला मदत करतो. म्हणजेच गुगलवर जाऊन विविध टॅब्समध्ये अनेक लिंक्स सर्च करण्यापेक्षा चॅटजीपीटीवर एक प्रॉम्प्ट एंटर करून आपण सर्व लिंक एकाच ठिकाणी पाहू शकतो. यामुळेच अनेकजण चॅटजीपीटीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. तुम्ही देखील अशाच यूजर्सपैकी आहात का? तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

अमेरिकेचा मोठा निर्णय! Anthropic ने अचानक बंद केले दोन प्रगत AI मॉडेल्स; भारतावरही परिणाम होण्याची शक्यता

 

चॅटजीपीटीवर दिसल्या फेक वेबसाईट्स

अलीकडेच ब्रिटनमध्ये एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये चॅटजीपीटीमधील सर्च रिजल्ट्समध्ये काही फेक ‘शॉपिंग’ वेबसाइट्स दिसल्या. यामुळे अनेक यूजर्स स्कॅमचे शिकार बनले. स्कॅम-डिटेक्शन सर्विस ‘आस्क सिल्वर’ने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी प्रसिद्ध रिटेल ब्रँड्सच्या खोट्या वेबसाईट्स तयार केल्या. जेव्हा यूजर्स चॅटजीपीटीकडून एखाद्या प्रोडक्टबाबत माहिती विचारायचे तेव्हा सर्च रिजल्टमध्ये या खोट्या वेबसाईट्स देखील दाखवल्या जात होत्या. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कसा घडतो स्कॅम?

समजा, तुम्हाला एखाद्या ब्रँडची बॅग खरेदी करायची आहे आणि तुम्ही चॅटजीपीटीकडून सल्ला मागितला. आता चॅटीजीपीटी तुम्हाला अशा काही वेबसाईट्स दाखवेल, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅग्स दिसतील आणि या बॅग्स खरेदी करण्यासाठी लिंक देखील दिसेल. पण अशी दाट शक्यता आहे की, जर तुम्ही यामध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक केले तर तुमच्यासमोर एखादी खोटी वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट एखाद्या खऱ्या ब्रँडच्या वेबसाईटप्रमाणे दिसते, मोठ्या डिस्काऊंटचा दावा करते आणि ग्राहकांची पेमेंट आणि बँकिंग माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते.

काय आहे एआय पॉईजनिंग?

एखादी वेबसाईट एआयने सुचवली आहे किंवा ती वेबसाईट एखाद्या लिस्टिंगमध्ये दिसत आहे, म्हणून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. यामुळे स्कॅम आणि फ्रॉडसारख्या घटना घडू शकतात. या खोट्या वेबसाईटची लिंक प्रसिद्ध एआय टूलमध्ये दिसण्याचे कारण असे आहे की, स्कॅमर्स इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात खोटा कंटेट आणि क्लोन वेबसाईट्स अपलोड करतात. याचा परिणाम असा होतो की, एआय मॉडेल्स चुकून या खोट्या आणि लोकांना भरकटवणाऱ्या सोर्सना खरे मानतात. या संपूर्ण प्रोसेसिंगला एआय पॉईजनिंग (AI Poisoning) म्हटलं जातं.

अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री… 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट

शॉपिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या

  • वेबसाईटचे यूआरएल तपासा. अधिकृत डोमेन जसे .com किंवा .co.in तपासा. जर यूआरएलमध्ये ‘official’, ‘deals’, किंवा ‘sale’ सारखे शब्द दिसले तर सावध व्हा.
  • 70 ते 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटचा दावा करणाऱ्या वेबसाईट्सपासून सावध राहा.
  • AI टूलने दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याऐवजी, ब्राउझरमध्ये त्या ब्रँडचे नाव स्वतः शोधा आणि थेट त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Web Title: Stay alert while taking shopping suggestions from ai models it can show fake website links

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • Tech News

संबंधित बातम्या

अमेरिकेचा मोठा निर्णय! Anthropic ने अचानक बंद केले दोन प्रगत AI मॉडेल्स; भारतावरही परिणाम होण्याची शक्यता
1

अमेरिकेचा मोठा निर्णय! Anthropic ने अचानक बंद केले दोन प्रगत AI मॉडेल्स; भारतावरही परिणाम होण्याची शक्यता

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?
2

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती
3

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती

AI क्षेत्रात भारताची मोठी झेप! भारतीय कंपन्या करणार कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक; SAP अहवालात झाला खुलासा
4

AI क्षेत्रात भारताची मोठी झेप! भारतीय कंपन्या करणार कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक; SAP अहवालात झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.