अखेर तो दिवस आलाच! 50MP कॅमेऱ्यासह Samsung च्या नव्या स्मार्टफोनची तुफानी एंट्री... 2032 पर्यंत मिळणार कमाल अपडेट
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन ब्लू, ब्लॅक, लाइट पिंक आणि लाइट ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही. कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या रेंजमध्ये सादर करण्याची शक्यता आहे. कनेक्टिविटीसाठी सॅमसंग स्मार्टफोनमध्ये डुअल 5G, 4G, LTE, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगने सादर केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी ए 37 आणि गॅलेक्सी ए 57 प्रमाणेच इन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा वापर केला आहे. या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यासोबतच, या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
नवा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेटवर आधारित आहे. फोनमध्ये 6GB/8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये 128GB/256GB यूएफएस 3.1 स्टोरेजचा सपोर्ट देखील मिळणार आहे. फोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. यामध्ये कंपनीने हायब्रिड सिम कार्ड स्लॉट दिला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए27 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य आणि 5MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळणार आहे. मुख्य कॅमेऱ्यामध्ये ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन फीचर मिळणार आहे. फोनमध्ये 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12MP चा कॅमेरा मिळणार आहे.
30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट! वेळीच करा हे महत्त्वाचं काम, अन्यथा…
सॅमसंग गॅलेक्सी ए27 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI वर काम करते. कंपनीने आश्वासन दिले आहे की वापरकर्त्यांना सहा वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स मिळतील. फोनला IP64 रेटिंग मिळाली आहे.






