24GB रॅम आणि पावरफुल प्रोसेसरसह लाँच झाला हा स्मार्टफोन, कॅमेरा क्वालिटीही जबरदस्त! किंमत जाणून घ्या
सर्वचजण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या स्मार्टफोनची वाट पाहत आहेत, तो स्मार्टफोन म्हणजेच Red Magic 10 Pro आता अखेर जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. स्मार्टफोनच्या प्रो मॉडेलच्या ग्लोबल व्हेरियंटमध्ये चायना व्हेरियंट प्रमाणेच फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र, या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टऐवजी 100W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आहे. तसेच, या फोनमध्ये लिक्विड मेटल कूलिंगसह ड्युअल-पंप व्हेपर चेंबर आहे. स्मार्टफोनमध्ये 24GB रॅम देण्यात आला आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Red Magic 10 Pro स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Red Magic 10 Pro च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 649 डॉलर म्हणजेच अंदाजे 55,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन आणखी दोन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्येही उपलब्ध करून देण्यात आला आहे. फोनच्या 16GB + 512GB मॉडेलची किंमत 799 डॉलर म्हणजेच अंदाजे 68,000 रुपये आणि 24GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 999 डॉलर म्हणजेच अंदाजे 85,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा फोन 12 डिसेंबरपासून आशिया-पॅसिफिक, युरोप, लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका, मध्य पूर्व, यूके आणि यूएसमध्ये एंट्री करणार आहे. फोनची विक्री 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा हँडसेट डस्क, मूनलाईट आणि शॅडो या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Red Magic 10 Pro स्मार्टफोन Android 15 वर आधारित Red Magic OS 10.0 वर चालतो. यात 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8-इंच फुल-एचडी+ (1,216×2,688 पिक्सेल) BOE Q9+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 2,000 nits ची पीक ब्राइटनेस, 10-बिट कलर डेप्थ आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट कव्हरेज आहे.
Red Magic 10 Pro स्मार्टफोन क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 24GB पर्यंत LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 प्रो स्टोरेज देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, जो 24GB पर्यंत LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 प्रो स्टोरेजसह जोडलेला आहे.
यात एक डेडिकेटेड रेड कोर R3 ग्राफिक्स प्रोसेसर देखील आहे, जो डबल फ्रेम इन्सर्टेशन, 2K अपस्केलिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे स्टेबलाइजेशनसह व्हिज्युअल सुधारण्याचा दावा करतो. कंपनीने म्हटले आहे की टेम्परेचर नियंत्रणात ठेवण्यासाठी, हा नवीनतम फोन 12,000 स्क्वेअर मिलिमीटर ड्युअल-पंप व्हेपर चेंबर, ग्राफीन शीट आणि लिक्विड मेटल कूलिंगसह ICE-X मॅजिक कूलिंग सिस्टमसह सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी Red Magic 10 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, यात 50MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देखील आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, Red Magic 10 Pro मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, GPS, NFC, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि USB 3.2 टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे.
Red Magic 10 Pro स्मार्टफोनमध्ये 7,050mAh ड्युअल-सेल बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.