फ्री-फ्री-फ्री! 90 हजारांचे अॅपल वॉच मोफत खरेदी करण्याची संधी, फक्त पूर्ण करावी लागणार ही अट
टेक जायंट कंपनी अॅपल आणि त्यांचे प्रोडक्ट युजर्समध्ये लोकप्रिय आहे. पण या सर्व प्रोडक्टची किंमत देखील प्रचंड आहे. त्यामुळे अनेकांना हे प्रोडक्ट खरेदी करणं शक्य नसतं. पण जर अॅपलचे प्रोडक्ट मोफत ऑफर केली जात असतील तर? ऐकूण आश्चर्य वाटलं ना, पण होय हे खरं आहे. तुम्हाला 90 हजारांचे अॅपल वॉच मोफत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरने गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. आता या ऑफरची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून एक्स आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका धुमाकूळ घातला आहे. “अॅपल वॉच फ्री-फ्री-फ्री!” हे ऐकून लोक खूश झाले आहेत. पोस्टनुसार, Apple Watch SE, Apple Watch Ultra 2, आणि नवीनतम Apple Watch 10 सारखी प्रीमियम मॉडेल्स मोफत उपलब्ध आहेत. पण हे वॉच घेण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी अट पूर्ण करावी लागणार आहे. ही अट म्हणजे तुम्हाला दिवसाला 15,000 पावले चालावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ऑफर खरोखर समजून घेण्यासाठी, तुम्ही आयफोन युजर असणे आवश्यक आहे, कारण Apple Watch फक्त iPhones सोबत जोडते. अँड्रॉईड वापरकर्त्यांना या ऑफरमधून वगळण्यात आले आहे. तुम्हाला या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी अॅपल वॉच खरेदी कारवं लागणार आहे. यानंतरच ही ऑफर लागू केली जाईल.
अॅपल वॉच खरेदी करणे आवश्यक: प्रथम तुम्हाला 24,900 रुपयांपासून ते 89,900 रुपयांपर्यंतचे अॅपल वॉच खरेदी करावे लागेल. ऑफरमध्ये EMI चा पर्याय दिलेला नाही, त्यामुळे एकरकमी पेमेंट करावे लागेल.
HDFC ॲपवर नोंदणी करा: घड्याळ खरेदी केल्यानंतर, तुम्हाला HDFC Ergo Zopper ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचे केवायसी पूर्ण करावे लागेल, ज्यामध्ये पॅन कार्ड आणि बँक तपशील प्रदान करणे समाविष्ट आहे. इथे तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ऑफरसाठी रजिस्टर करू शकता.
अॅपल वॉचचे तंत्रज्ञान: या ऑफरचा सर्वात मनोरंजक पैलू म्हणजे अॅपल वॉचचे तंत्रज्ञान तुमच्या पावले आणि हृदयाच्या गतीचे बारकाईने निरीक्षण करते. काही अनियमितता आढळल्यास ती त्वरित पकडली जाईल.
हेल्थ चेकअप: या आव्हानात उडी मारण्याआधी, तुमचे आरोग्य त्याला साथ देण्यासाठी परिपूर्ण असल्याची खात्री करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अॅपलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अटी आणि शर्ती: जर तुम्ही दररोज 12 किलोमीटर चालायला तयार असाल तर ही ऑफर आकर्षक असू शकते. परंतु तुम्ही एचडीएफसी एर्गो ॲपवर लॉग इन करताच, अटी आणि शर्ती असलेला ईमेल काळजीपूर्वक वाचा.
फिटनेस आणि मेहनत: ही ऑफर म्हणजे फिटनेस आणि मेहनत यांचा उत्तम मेळ आहे, पण ते गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे. शेवटी काहीही मोफत मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.