नवीन लॅपटॉप खरेदी करायचा, पण बजेट 20 हजारांपेक्षा कमी आहे? हा आहे बेस्ट ऑप्शन
लॅपटॉप आपल्याला आपल्या प्रत्येक कामासाठी गरजेचा आहे. ऑफीस असो किंवा कॉलेज लॅपटॉप अत्यंत गरजेचा आहे. याशिवाय ऑनलाईन क्लासेस असो किंवा वर्क फ्रॉम होम सगळ्यासाठी आपल्याला लॅपटॉपची गरज असते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना नवीन लॅपटॉप खरेदी करण्याची इच्छा असते. पण प्रचंड किंमतीमुळे अनेकजण लॅपटॉप खरेदी करत नाहीत. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका लॅपटॉबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. किंमत कमी असली तरी लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स अगदी तगडे आहेत.
जर तुम्ही लॅपटॉप शोधत असाल पण बजेटबद्दल काळजी करत असाल, तर तुमच्यासाठी Acer चा नवीन लॅपटॉप एक उत्तम पर्याय ठरणार आहे. कमी बजेटमध्ये लॅपटॉप शोधणाऱ्यांसाठी Acer चा नवा लॅपटॉप एक चांगला पर्याय ठरू शकतो. अलीकडे Acer ने एक उत्तम लॅपटॉप लाँच केला आहे. कंपनीने 20,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये Acer Aspire 3 लाँच करण्यात आला आहे. या लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. जास्त पैसे खर्च न करता ग्राहक हा लॅपटॉप खरेदी करू शकतात. Acer ने एक लॅपटॉप डिझाइन केला आहे जो विशेषतः विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Acer Aspire 3 भारतात 15,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. नवीनतम लॅपटॉप ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. यामध्ये तीन व्हेरिअंट उपलब्ध आहेत, याबद्दल जाणून घेऊया. Acer Aspire 3 चा 8GB + 128GB व्हेरिअंट 14,990 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. 8GB + 256GB व्हेरिअंट 17,990 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. 8GB + 512GB व्हेरिअंट 19,990 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
कॉम्पॅक्ट आणि लाइटवेट डिझाइन– कॉम्पॅक्टनेसच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही. लॅपटॉप अतिशय हलक्या डिझाइनसह येतो.
OS– गुळगुळीत अनुभवासाठी यात Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम आहे.
प्रोसेसर– परफॉर्मन्ससाठी नवीन लॅपटॉपमध्ये Celeron N4500 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. जे 8 GB RAM सह जोडलेले आहे.
डिस्प्ले– यात 11.6-इंचाचा HD Acer ComfyView LED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1366 x 768 पिक्सेल आहे.
ग्राफिक्स – फिकट ग्राफिक्स-संबंधित कार्यांसाठी लॅपटॉमध्ये इंटेल UHD ग्राफिक्सची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
वेबकॅम– ऑनलाइन क्लासेस आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वेबकॅम सुविधा प्रदान करण्यात आली आहे. 1TB पर्यंत अतिरिक्त स्टोरेज समर्थित आहे.
बॅटरी– लॅपटॉप 38Wh बॅटरीने सुसज्ज आहे.
कनेक्टिव्हिटी पर्याय– हे USB Type-C, USB 3.2 Gen 1, HDMI पोर्ट आणि microSD कार्ड रीडरसह येते.
Acer Aspire 3 (2025) चे प्रोफाइल 16.8mm आणि वजन 1kg आहे. जे वापरासाठी एक पोर्टेबल पर्याय बनवते. कनेक्टिव्हिटीसाठी, हे USB 3.2 Gen 1 पोर्ट, USB Type-C पोर्ट, HDMI पोर्ट आणि एक microSD कार्ड रीडरसह येते, ज्यामुळे वापरकर्त्यांना ते इतर डिव्हाइसेस आणि पेरिफेरल्सशी कनेक्ट करता येते. लॅपटॉपमध्ये 720p HD वेबकॅम आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर देखील आहेत. एसरचा दावा आहे की त्यात मल्टी-जेश्चर सपोर्टसह मायक्रोसॉफ्ट प्रिसिजन-सर्टिफाइड टचपॅड आहे.