Elon Musk च्या Starlink ला एयर इंडियाचा झटका! Tata ची मोठी झेप, विमानांमध्ये मिळणार ही सेवाElon Musk च्या Starlink ला एयर इंडियाचा झटका! Tata ची मोठी झेप, विमानांमध्ये मिळणार ही सेवा
तुम्ही एअर इंडियाच्या फ्लाईटने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये इंटरनेटचा वापर करू शकणार आहात. टाटा ग्रुपच्या मालकिच्या असलेल्या एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर वाय-फाय सेवा सुरू केली आहे. ही सेवा Airbus A350, Boeing 787-9 आणि Airbus A321neo च्या निवडक विमानांवर उपलब्ध आहे. त्यामुळे आता विमानाने प्रवास करताना नेटवर्कची चिंता करण्याची गरज नाही.
Redmi चा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच, नवीनतम MediaTek प्रोसेसरसह मिळणार हे खास फिचर्स
एअर इंडिया ही भारतातील देशांतर्गत उड्डाणांवर वाय-फाय सेवा देणारी पहिली एअरलाइन बनली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एलन मस्कच्या स्टारलिंकची चर्चा भारतात सुरु आहे. स्टारलिंक लवकरच भारतात त्यांची सेवा सुरु करेल, ज्यामुळे प्रवाशांना विमानांमध्ये देखील इंटरनेटचा आनंद घेता येईल, ही घोषणा झाल्यानंतर सर्वचजण स्टारलिंकच्या भारतातील आगमनाची वाट बघत आहेत. मात्र अशातच आता एअर इंडियाने एक मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतात आगमन होण्यापूर्वीच एलन मस्कच्या स्टारलिंकला मोठा झटका मिळाला आहे. एअर इंडियाच्या या कामगिरीने स्टारलिंकच्या भारतातील आगमनावर काय परिणाम होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
एअर इंडियाच्या फ्लाइटमधील प्रवासी सोशल मीडिया आणि मॅसेजिंग ॲप्समध्ये प्रवेश करू शकतात आणि या सेवेचा वापर करून प्रवासी त्यांच्या कुटूंबिय आणि मित्रांसोबत कनेक्ट राहू शकतात. आयओएस किंवा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन सारख्या उपकरणांवर वाय-फाय वापरता येऊ शकते. याव्यतिरिक्त, प्रवासी 10,000 फुटांवरून उड्डाण केल्यानंतर एकाच वेळी अनेक डिव्हाईस कनेक्ट करू शकतात.
देशांतर्गत मार्गांवर वाय-फाय सुरू करण्यापूर्वी, एअर इंडियाने पायलट प्रोग्राम अंतर्गत एअरबस A350, निवडक Airbus A321 निओ आणि बोईंग B787-9 विमानांवर वाय फाय सेवा सुरु केली होती, जी न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि सिंगापूर सारख्या उड्डाणांवर उपलब्ध आहे. सुरुवातीच्या टप्प्यात वाय-फाय सेवा मोफत उपलब्ध होणार आहे.
एअर इंडियाने म्हटले आहे की ते त्यांच्या उर्वरित विमानांमध्येही हळूहळू वाय-फाय सेवा सुरू करण्य़ाच्या तयारीत आहेत. तथापि, एअरलाइनने असेही नमूद केले आहे की इन-फ्लाइट वाय-फाय कनेक्शन विविध घटकांवर अवलंबून असते, जसे की उपग्रह कनेक्टिव्हिटी, एकूण बँडविड्थ वापर, उड्डाण मार्ग आणि सरकारी नियम.
Tech Tips: Youtube च्या Cooking चॅनेलवरील व्हिडीओ व्हायरल होत नाही? तुमच्या या चूका सुधारण्याची गरज
वाय-फाय कनेक्ट करण्यासाठी, प्रवाशांनी त्यांच्या डिव्हाइसवर वाय-फाय सुरू करणे आवश्यक आहे. ‘एअर इंडिया वाय-फाय’ नेटवर्क निवडा आणि पोर्टलवर त्यांचा PNR क्रमांक आणि आडनाव हे डिटेल्स फील करा. आता तुमच्या डिव्हाईसमध्ये एअर इंडिया वाय-फाय कनेक्ट होईल, ज्याच्या मदतीने तुम्ही सोशल मीडिया, मॅसेजिंग ॲप्ससारख्या टूल्सचा वापर करू शकता.