Redmi चा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच, नवीनतम MediaTek प्रोसेसरसह मिळणार हे खास फिचर्स
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने नवीनतम स्मार्टफोन Redmi Turbo 4 चीनमध्ये लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Turbo सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. आकर्षक लुकमध्ये हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या नवीनतम स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच 120Hz LTPS OLED स्क्रीन देण्यात आली आहे ज्याची कमाल ब्राइटनेस 3200 nits आहे.
Tech Tips: Instagram वर मित्राचे DM वाचा आणि त्याला कळणारही नाही! ही आहे सोपी ट्रीक
या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8400-Ultra SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह लाँच होणार हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. यात 5000mm² स्टेनलेस स्टील VC कुलिंग, अल्ट्रा-थिन 3D IceLoop सिस्टीम आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चीनमध्ये Redmi Turbo 4 स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. Xiaomi लवकरच हा फोन भारतात आणि जागतिक बाजारात लाँच करू शकते. (फोटो सौजन्य – X)
डिस्प्ले – Redmi Turbo 4 मध्ये 6.67-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे. हा डिस्प्ले डॉल्बी व्हिजनसह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i संरक्षणला सपोर्ट करतो.
प्रोसेसर – Redmi चा हा नवीन स्मार्टफोन MediaTek Dimension 8400 Ultra 4nm प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे, ज्यात ग्राफिक्स सपोर्टसाठी Mali-G720 MC6 GPU आहे. हा फोन 12GB / 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB / 512GB UFS 4.0 स्टोरेजसह येतो. Redmi च्या Turbo सीरीजचा हा फोन Android 15 वर आधारित Xiaomi HyperOS 2 वर चालतो.
कॅमेरा – कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा उपलब्ध आहे. या नवीनतम स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे, ज्यामध्ये 8MP सेकंडरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप OIS, EIS सह 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 20MP फ्रंट कॅमेरा आहे.
फिचर्स – फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, इन्फ्रारेड सेन्सर, यूएसबी टाइप-सी ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर, IP66 + IP68 + IP69 रेटिंग सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G SA/NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 ac (2.4GHz + 5GHz), Bluetooth 6.0, GPS, USB Type-C पोर्ट आणि NFC आहेत. या फोनमध्ये 6550mAh बॅटरी आहे जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
रेडमी टर्बो 4 स्मार्टफोन क्लाउड व्हाईट, लाइट सी ब्लू आणि शॅडो ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Vivo घेऊन येतोय Mixed Reality Headset! Apple Vision Pro ला देणार जबरदस्त टक्कर
Redmi Turbo 4 स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 1999 युआन म्हणजेच सुमारे 23,485 रुपये आहे. Redmi Turbo 4 स्मार्टफोनच्या 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 2199 युआन म्हणजेच सुमारे 25,835 रुपये आहे. Redmi Turbo 4 स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 2299 युआन म्हणजेच सुमारे 27,015 रुपये आहे. Redmi Turbo 4 स्मार्टफोनच्या 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 2499 युआन म्हणजेच सुमारे 29,365 रुपये आहे.