Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर DeepSeek वर बंदी, यूएस नेव्हीचा मोठा निर्णय! AI मॉडेलबाबत जारी केले हे कठोर नियम

यूएस नेव्हीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवून चीनी AI मॉडेल DeepSeek वापरणे टाळण्यास सांगितले आहे. यूएस नेव्हीच्या ईमेलमध्ये डीपसीकबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. ईमेलमध्ये काय म्हटलं आहे याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2025 | 11:51 AM
अखेर DeepSeek वर बंदी, यूएस नेव्हीचा मोठा निर्णय! AI मॉडेलबाबत जारी केले हे कठोर नियम

अखेर DeepSeek वर बंदी, यूएस नेव्हीचा मोठा निर्णय! AI मॉडेलबाबत जारी केले हे कठोर नियम

Follow Us
Follow Us:

सर्वत्र चर्चेत असणारा आणि अमेरिकेत Apple च्या App Store वर OpenAI च्या ChatGPT ला मागे टाकणाऱ्या चीनी AI मॉडेल DeepSeek बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यूएस नेव्हीने चीनी AI मॉडेल DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय काही कठोर नियम देखील जारी करण्यात आले आहेत. अचानक AI मॉडेलची वाढलेली लोकप्रियता आणि करण्यात आलेल्या आरोपांमुळे अनेकांनी DeepSeek बाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर उपाय म्हणून DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Alibaba ने लाँच केलं नवीन AI मॉडेल, DeepSeek V3 पेक्षा किती प्रगत? कंपनीचा परफॉर्मेंसबाबत मोठा दावा

काय आहे संपूर्ण प्रकरण

अलीकडेच लाँच झालेल्या DeepSeek ने काहीच काळात प्रचंड प्रगती केली आहे. DeepSeek ने अमेरिकेत Apple च्या App Store वर जगातील पहिलं AI मॉडेल ChatGPT देखील मागे टाकलं. DeepSeek हे चिनी एआय ॲप अलीकडे तंत्रज्ञान जगतात चर्चेचा विषय बनले आहे. त्याच्या लोकप्रियतेसोबतच सुरक्षा आणि नैतिकतेबद्दलची चिंताही वाढत आहे. अलीकडेच, यूएस नेव्हीने आपल्या सदस्यांना डीपसीकचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. तसेच नेव्हीने काही कठोर नियम देखील जारी केले आहेत.  (फोटो सौजन्य –सोशल मीडिया)

यूएस नेव्हीने डीपसीकवर बंदी का घातली?

यूएस नेव्हीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवून चीनी AI मॉडेल DeepSeek वापरणे टाळण्यास सांगितले आहे. नौदलाने चेतावणी दिली आहे की हे मॉडेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असू शकते, म्हणून ते कामासाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी डाउनलोड किंवा इंस्टॉल करू नये. DeepSeek एक ओपन-सोर्स AI मॉडेल आहे, याचा अर्थ कोणीही ते विनामूल्य वापरू शकतो. आणि याच कारणामुळे DeepSeek प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

DeepSeek नंतर आता Kimi ची एंट्री, चिनी कंपनीच्या AI मॉडेल्सची जगभरात चर्चा! हे चॅटबोट पडले मागे

DeepSeek बाबात एक खास गोष्ट म्हणजे हा AI फक्त 6 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 50 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे, हा खर्च OpenAI आणि Google सारख्या दिग्गजांपेक्षा खूपच कमी आहे. डीपसीकच्या या यशाचा आर्थिक बाजारांवरही परिणाम झाला, जेव्हा बातमी आली की कंपनीने हा AI अत्यंत कमी खर्चात विकसित केला आहे, तेव्हा Nvidia आणि Broadcom सारख्या AI चिप बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले.

नौदलाच्या ईमेलमध्ये काय म्हटले होते?

सध्या प्रचंड चर्चेत असणाऱ्या DeepSeek बद्दल आता अखेर यूएस नेव्हीने एक कठोर निर्णय घेतला आहे. यूएस नेव्हीच्या ईमेलमध्ये डीपसीकबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. ईमेलमध्ये म्हटले आहे की, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ज्याबद्दल आता आम्ही तुम्हाला जागरूक करू इच्छितो, हे अपडेट नवीन AI मॉडेल DeepSeek शी संबंधित आहे. यूएस नेव्हीने AI मॉडेल DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून कोणताही कर्मचारी ह्या AI मॉडेलचा वापर करणार नाही, मग ते कामाशी संबंधित असो किंवा वैयक्तिक वापरासाठी. हे स्पष्ट आहे की अमेरिका या चीनी एआय ॲपबद्दल सावध आहे आणि त्याच्या सुरक्षेबाबत तडजोड करू इच्छित नाही.

Web Title: Tech news america navy banned chinese ai app deepseek know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Sony Bravia 9 II ची दमदार एंट्री! AI फीचर्ससह मिळणार जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव, जाणून घ्या वैशिष्ट्य
1

Sony Bravia 9 II ची दमदार एंट्री! AI फीचर्ससह मिळणार जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव, जाणून घ्या वैशिष्ट्य

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर
2

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही
3

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स
4

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.