एका Aadhar Card वर किती SIM Card खरेदी केले जाऊ शकतात? काय सांगतात नियम, जाणून घ्या
आजच्या काळात आपल्यासाठी आधार कार्ड आणि सिम कार्ड या दोन्ही गरजेच्या गोष्टी आहेत. भारत सरकारव्दारे नागरिकांना दिलं जाणार आधार कार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. प्रत्येक भारतीयाकडे त्याच्या भारतीयत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्ड केवळ ओळखीचा पुरावा म्हणूनच नाही तर अनेक ठिकाणी आपल्यासाठी फायद्याचे ठरते. जसं की कॉलेज, शाळा आणि ऑफीस. शिवाय तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे.
एवढचं नाही तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी सिमकार्ड खरेदी करायचे असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला आधार कार्डची गरज लागते. तुम्हाला माहीत आहे का, की आधार कार्डवर सिम कार्ड खरेदीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड घेतल्यास तुम्हाला कायदेशीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सायबर क्राईम, डिजीटल फसवूणक, यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेत सिम कार्ड खरेदीवर मर्यादा निश्चित केली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका आधार कार्डवर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी केले जाऊ शकतात. मात्र या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड खरेदी केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तथापि, मशीन टू मशीन (M2M) सेवांसाठी ही संख्या 18 पर्यंत वाढू शकते. M2M सेवा विशेषत: वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्मार्ट होम डिव्हाइसेस आणि IoT सिस्टीम यासारख्या उपकरणांना जोडण्यासाठी आहेत.
तुम्ही 9 पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केल्यास किंवा योग्य कारणाशिवाय त्यांचा वापर केल्यास, तुम्हाला पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते:
सिम कार्ड ब्लॉक होणं: तुम्ही 9 पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केल्यास किंवा चुकीच्या कामांसाठी या सिमकार्डचा वापर केल्यास तुमच्या ओळखीचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त सिम कार्ड ब्लॉक केले जाऊ शकतात.
फसवणूक होण्याची शक्यता: सिम कार्ड्सचा गैरवापर केल्याने सायबर फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर अॅक्टिव्हिटीज होऊ शकतात.
कायदेशीर कारवाई: तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले सिमकार्ड कोणत्याही बेकायदेशीर कामात वापरले असल्यास, तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
ग्राहक पडताळणी: TRAI आणि दूरसंचार विभाग वेळोवेळी सिम कार्ड वापरकर्त्यांची पडताळणी करतात. तुमच्या सिम कार्डची संख्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला चेतावणी दिली जाईल.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत याची माहिती मिळवण्यासाठी सरकारने TAFCOP (Telecom Analytics for Froad Management and Consumer Protection) पोर्टल सुरू केले आहे.