अतिवृष्टीच्या अस्मानी संकटाने व फसव्या मदतीच्या सुलतानी संकटाने महाराष्ट्रातील शेतकरी बेजार आहेत. सरकारने स्वतः निवडणुकीच्या प्रचारात “सरसकट कर्जमाफी” करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांची मते घेऊन सत्तेत आलेल्या सरकारने प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. अतिवृष्टीमुळे पिकांसह अक्षरशः मातीही वाहून गेलेली असताना सरकारने निव्वळ आकड्यांची धुळफेक करत शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली आहे.
याचाच निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अंगाला भाज्या बांधून सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला.